साताऱ्यातील गुरुवार बागेच्या मीटर रुममध्ये दिवसा चालतोय तरुण तरुणींचा भलताच खेळ

सातारा : आबालवृद्धांच्या विरंगुळ्याचे हक्काचे ठिकाण असलेल्या गुरुवार बागेतील मीटर रुमचा वापर जोडप्यांसाठी केला जात असल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या मीटर रुममध्ये ‘भलतेच’ प्रकार घडत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालिका मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे केली आहे.

शनिवार पेठेतील गुरुवार बाग विस्ताराने मोठी असून, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या बागेत दररोज सकाळी व सायंकाळी आबालवृद्ध मोठ्या संख्येने हजेरी लावत असतात. ही बाग केव्हा उघडायची व केव्हा बंद करायची, याचे वेळापत्रक ठरविण्यात आले असून, प्रवेशद्वाराच्या चाव्या ठेकेदाराने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांसह काही नागरिकांना देण्यात आल्या आहेत. गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास पालिकेतील एक कर्मचारी बागेत मतदान जनजागृतीसाठी आले होते. यावेळी बागेतील मीटर रुममध्ये घडलेला प्रकार पाहून ते अवाक् झाले.

मीटर रुमला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते. त्या रुममध्ये कोणीतरी असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. काही वेळानंतर ठेकेदाराने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांकडून सर्वांसमोर मीटर रुमचे कुलूप उघडण्यात आले. यावेळी त्या रुममधून तरुण-तरुणी बाहेर आले. पालिका कर्मचाऱ्याकडून घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. घडलेला हा प्रकार गंभीर असून, काही सुज्ञ नागरिकांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्याकडे ऑनलाइन तक्रार नोंदवून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

‘अशा’ घटनेची पहिलीच वेळ..

गुरुवार बागेतील कुलूपबंद मीटर रुममध्ये तरुण-तरुणी आढळून आल्याने हा विषय भलताच चर्चेचा ठरला आहे. बागेत अशाप्रकारची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त