छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
आशपाक बागवान
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
- बातमी शेयर करा

पुसेसावळी : पुसेसावळी मंडलातील सर्व गावातील नागरिकांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय उपविभाग माण-खटाव आणि तहसिल कार्यालय खटाव यांच्या नेतृत्वाखाली गुरूवार, दि. ५ जून रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत कॅम्पचे आयोजन येथील ग्रामदैवत मारूती मंदिर येथे केले आहे. या कॅम्पमध्ये सातबारा उताऱ्यावरील अ.पा.क. शेरा कमी करणे, ए.कु.मॅ. नोंदी कमी करणे, कालबाह्य नोंदी कमी करणे जसे तगाई कर्ज, बंडिंग कर्ज, भू-सुधार कर्ज, इतर पोकळीस्त नोंदी, भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार प्रलंबित कजापचा अंमल सातबारा सदरी घेणे, पोट खराब वर्ग 'अ' खालील क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतरित करून सातबारा सदरी अंमल घेणे, नियंत्रित सत्ता प्रकार आणि शेरे प्रकार निहाय पडताळणी करून सातबारा सदरी अंमल घेणे, भोगवटादार वर्ग-१ व भोगवटादार वर्ग २ असे स्वतंत्रपणे भूधारणा प्रकार निहाय सातबारा तयार करणे. अंतिम निस्तार पत्रकानुसार स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेणे, महिला वारस नोंदी करणे, कालबाह्य व निरुपयोगी नोंदी सातबारा उताऱ्याहून कमी करणे आदी कामकाज होणार आहे.
त्यासोबतच फार्मर आयडी (किसान कार्ड), ई-पीक पाहणी, उत्पन्न दाखले, रहिवासी, डोमिसाईल दाखले, डोंगरी दाखले, जातीचा दाखले, नॉन क्रिमीलेअर दाखले, ईडब्ल्यूएस दाखले, अल्पभूधारक दाखले, भूकंपग्रस्त दाखले, प्रकल्पग्रस्त दाखले, कुणबी दाखले बाबतही कामकाज होणार आहे.तातडीने मिळणाऱ्या सुविधा जागेवरच दिल्या जाणार आहेत तर इतर कामांसाठीचे कागदोपत्री पुराव्यांसह परिपूर्ण प्रस्ताव जमा करून त्यावरील काम आवश्यक तितक्या लवकर पुर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासन प्रयत्नशील असणार आहे.यावेळी मंडलाधिकारी प्रविण घोरपडे यांचेसह मंडलातील सर्वच ग्राम महसूल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या करिता संबंधित शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सर्व क्षेत्राचे ७/१२ व ८ अ उतारे (खाते उतारा) सोबत आणावेत, असे आवाहन ग्राम महसूल अधिकारी संदीप काटकर यांनी केले आहे.
@pusesavali
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Wed 4th Jun 2025 12:12 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Wed 4th Jun 2025 12:12 pm