वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Satara News Team
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा स्थानिक गुन्हे शाखेने अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या, विक्री करणाऱ्या आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोन पोलीस अभिलेखावरील आरोपींना रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, ओम बापूराव महानवर (रा. साखरवाडी, ता. फलटण) आणि श्रीय उर्फ मॉन्टी शरद खताळ (रा. कापडगाव, ता. फलटण) हे सातारा शहरातील वाढे फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल विकण्यासाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ सापळा रचला. पथकाने वाढे फाटा परिसरात मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींना त्यांच्या एका साथीदारासह ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून १ देशी बनावटीचे पिस्तूल, १ जिवंत काडतूस, १ बजाज पल्सर मोटार सायकल आणि ३ मोबाईल हँडसेट असा एकूण १,८०, २००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. २५८/२०२५ भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, ७, २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर यांच्यासह पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, सचिन साळुंखे, मंगेश महाडीक, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, प्रविण कांबळे, सनी आवटे, अमोल माने, अजित कर्णे, मुनीर मुल्ला, अमित माने, राजू कांबळे, अरुण पाटील, मनोज जाधव, शिवाजी भिसे, राकेश खांडके, अमित झेंडे, अजय जाधव, प्रविण पवार, धीरज महाडीक, रवि वर्णेकर, वैभव सावंत, स्वप्नील दौंड आणि संकेत निकम यांनी सक्रिय सहभाग घेतला. या कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
संबंधित बातम्या
-
फलटण ग्रामीण पोलिसांनी चार पिस्टल बहाद्दर केले जेरबंद.
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
-
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
-
शिवीगाळ व धमकी प्रकरणातील फरार आरोपी असीम आतारच्या मुसक्या फलटण पोलिसांनी आवळल्या
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
-
फलटण येथे छत्रपती संभाजी महाराज यांची इंस्टाग्राम वरची पोस्ट डिलीट करण्यासाठी आजीम आतार याची शिवीगाळ व धमकी
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
-
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
-
वाठार (निंबाळकर) येथील रवींद्र खोपडे यांचा खाजगी सावकारांच्या त्रासाने संसार उध्वस्त.
- Wed 16th Jul 2025 05:34 pm
-
तपासणी थांबवतो’ म्हणत दोन लाखाची लाच मागितली… ACB ने कोरेगावच्या पुरवठा निरीक्षण अधिकाऱ्याचा केला गेम ओव्हर!
- Wed 16th Jul 2025 05:34 pm











