खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती

पुसेसावळी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी सापळा रचून केलेल्या कारवाईत शरण देवीसिंग पावरा, वय-४३ वर्षे, नोकरी विस्तार अधिकारी, पंचायत समिती,खटाव (वडूज), वर्ग-३ मुळ रा. मु.पो. अंबापूर ता शाहदा, जि. नंदुरबार. सध्या रा. डंगारे पेट्रोलपंप शेजारी, शिवाजी नगर, दहिवडी ता. माण जि.सातारा यास मागणी केलेल्या १० हज्जार पैकी पहिला हप्ता ५०००/- घेताना रंगेहाथ पकडले.


 सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे पत्नीचे नावे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सन २०२४-२०२५ या कालावधीतील मौजे पुसेसावळी येथे घरकुल मंजूर झाले होते. सदर घरकुलाचा हप्ता आरोपी लोकसेवक शरण देवीसिंग पावरा वय-४३ वर्षे, नोकरी -विस्तार अधिकारी सांख्यिकी, पंचायत समिती, खटाव (वडूज) यांनी रक्कम रूपये ७०,०००/- मंजूर करून दिला म्हणून तसेच यानंतरचे देखील घरकुलाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांना एकूण १०,०००/- रूपये लाचेची मागणी केली. त्यापैकी ५०००/- रूपये पहिला हप्ता आज रोजी व उर्वरीत ५०००/- रूपये लाच रक्कम पुढील आठवड्यात देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आज रोजी लाच रक्कमेतील पहिला हप्ता रक्कम रूपये ५०००/- पंचायत समिती, खटाव (वडूज) या कार्यालयात आरोपी लोकसेवक याने स्विकारताना त्यास ताब्यात घेण्यात आले असुन त्यांचेविरुद्ध वडुज पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ०१९१/२५ रात्री उशिरा दाखल करण्यात आला आहे.


 हि कारवाई श्री.राजेश वसंत वाघमारे, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा,श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि पुणे परिक्षेत्र, श्री.विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि पुणे, परिक्षेत्र, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सचिन राऊत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केली. या सापळा पथकात श्री. गणेश ताटे पो. हवा, श्री. सत्यम थोरात पो कॉ., श्री. अजयराज देशमुख यांचे मोलाचे सहकार्य लाभले. पुढील तपास श्री. सचिन राऊत, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा हे करत आहेत.


घरकुलास शासनाकडून रक्कम कमी अन् टक्केवारी जास्त. राज्य शासनाच्या वतीने घरकुलास जी सव्वा लाखाच्या जवळपास रक्कम देण्यात येत आहे. याची तुलना केली तर लोकसेवकांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या मालकीच्या बंगल्यातील शौचलयाचे भांडे हि महागडे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रतिनिधींना मात्र लाभार्थ्यांची नावे याद्यांमध्ये आल्याचे समाधान तर लोकसेवकांना सदरची यादी हि लाभार्थ्यांची न दिसता टक्केवारी च्या याद्या प्रसिद्ध झाल्याचा आनंद होत असावा. झालेल्या कारवाई नंतर तालुक्यातील ज्या लाभार्थ्यांनी टक्केवारी दिली असेल त्यांनी पुराव्यांसह संबंधित अधिकाऱ्यावर तक्रारी देणे आवश्यक असल्याची चर्चा खटाव तालुक्यातील जनमानसांत सुरू आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला