गुरु द्रोणा अकॅडमी फलटण येथे विद्यार्थ्यास मारहाण.

कुटुंबीयांच्या सतर्कतेने विद्यार्थ्यांची आत्महत्या थांबली.

फलटण. फलटण येथे महावीर स्तंभाजवळ गुरुद्रोणा अकॅडमी मध्ये मलठण येथील प्रीतम राजेंद्र निंबाळकर हा विद्यार्थी इयत्ता बारावी सायन्स शाखेतून शिक्षण घेत आहे. रविवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 8.30 वाजता प्रीतम अकॅडमी मध्ये हजर राहिला त्या दिवशी सकाळी 11 ते एक वाजेपर्यंत साप्ताहिक चाचणी परीक्षा होती. विद्यार्थी प्रीतम राजेंद्र निंबाळकर यांनी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आपल्या वडिलांच्या समक्ष नोंदविलेल्या तक्रारीनुसार अकरा वाजता साप्ताहिक चाचणी वरती सुपरविजन करण्याकरता प्रियांका मॅडम निरंजन गुरव सर व दोन शिपाई पवार, जाधव उपस्थित होते.

 फिजिक्स चा पहिला पेपर झाल्यानंतर प्रियांका मॅडम यांनी मुलांचे पेपर एकत्र करून केमिस्ट्री चा पेपर वाटण्यास सुरुवात केली परीक्षा हॉलमध्ये मुलांचा गोंधळ चालू होता मी माझे मित्र कोठे बसलेले आहेत हे पाठीमागे बघत असताना निरंजन गुरव सर माझ्याजवळ येऊन माझे तोंड दाबून माझ्या पाठीवर जोराने मारहाण केली. प्रीतम यांनी सरांना मला का मारता असे म्हणून विचारले तर पुन्हा हाताने मारहाण करून पेपर हातात देऊन पुढे बघ असे सांगितले. 

 यानंतर दुपारी मी एक वाजता अकॅडमी चाचणी झाल्यावर माझ्या घरी गेलो. हा ॲकॅडमीमध्ये चाचणीच्या वेळी घडलेला सर्व प्रकार मी माझे आई आणि वडील यांना सांगितल्यावर माझ्या वडिलांचा मी परत अकॅडमी येथे आल्यावर तीथे सरांची भेट होऊ शकली नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिनांक 28 जुलै 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मी गुरुद्रोणा अकॅडमी मध्ये असताना मला अविनाश नरुटे सर, महेश पतंगे सर, व गणेश कोकरे सर, यांनी मला बोलावून घेतले, म्हणाले की अकॅडमीत काय होते ते घरी सांगायचे नाहीत शिक्षक आहेत तुला चूक झाल्यावर ते मारणारच 

त्यानंतर मी घरी आल्यावर झालेल्या प्रकारावरून मला खूप मानसिक दुःख झाले माझ्या मित्रांच्या समोर मला खूप मारहाण केल्यामुळे माझी मानसिक स्थिती खालावली आणि मी 28 जुलै 2025 रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास माझ्या मित्रांसोबत झालेल्या मानहानीमुळे घरातील नायलॉनची दोरी घेऊन पत्र्याच्या अँगल ला बांधून गळ्याला दोरीचा फास घेण्याचा प्रयत्न करत होतो. परंतु माझे वडील तेथे आल्यामुळे त्यांनी असं काही करू नकोस ,आणि असे समजावून सांगून माझ्या हातातील दोरी काढून घेतली व मला स्टुल वरून खाली घेतले व मला समजावून सांगितले 

मला मानसिक त्रास झाल्याने मी निरंजन गुरव सर यांनी केलेल्या मारहाणीबाबत अविनाश नरोटे सर महेश पतंगे सर्व गणेश कोकरे सर यांनी केलेल्या मानसिक त्रासाबाबत मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता म्हणून मी पोलीस ठाणे तक्रार दिली आहे

. फलटण शहर पोलीस स्टेशन येथे आपली व्यथा तक्रारीच्या स्वरूपात मांडली आहे असे 17 वर्षीय विद्यार्थी प्रीतम राजेंद्र निंबाळकर यांनी सांगितले.

 या झालेल्या प्रकाराबाबत प्रीतम चे वडील आणि आई यांना ही मानसिक धक्का बसलेला आहे. फलटण शहरात अशा अकॅडमी चालू असून या अगोदरपासून सुद्धा बऱ्याच विविध सामाजिक संघटनांनी याबाबत शैक्षणिक संस्था आणि अकॅडमीच्या चाललेल्या कारभारावर प्रशासनाकडे तक्रारी दाखल केलेले आहे, तरी पण प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने न्यायालयीन दाद मागण्याच्या तयारीत आहेत . 

फलटण शहर पोलीस स्टेशन येथे गुरु द्रोणा अकॅडमीचे निरंजन गुरव सर अविनाश नरोटे सर महेश पतंगे सर गणेश कोकरे सर यांचे विरुद्ध भारतीय न्याय संहिता बी एन एस 2023, 115(2),3(5), कलमानुसार आणि अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015, (75) कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत प्रीतम याचे वडील श्री राजेंद्र निंबाळकर राहणार मलठण यांनी या प्रकाराबद्दल अतिशय तीव्र भावना व्यक्त केले आहे कदाचित मानसिकतेतून आणि आलेल्या नैराश्यातून माझ्या मुलाने आत्महत्याचा प्रयत्न करणे यामुळे मी खचून गेलो आहे. याबाबत अशा शिक्षकांच्या वर कठोर कारवाई होऊन योग्य शिक्षा मिळावी अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला