वरकुटे-मलवडीत जुगार अड्ड्यावर म्हसवड पोलिसांचा छापा; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : म्हसवड पोलिसांनी वरकुटे-मलवडी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकत तीन लाख 12 हजार 670 रुपयांचे जुगाराचे साहित्य रोख रक्कम व मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करत 11 जणांना ताब्यात घेतले आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, माण तालुक्यातील वरकुटे-मलवडी येथील सिद्धार्थ बनसोडे यांच्या घराच्या आडोशाला काही लोक तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पथकासह त्या ठिकाणी धाड टाकत कबीर विठ्ठल बनसोडे, अर्जुन सर्जेराव यादव, सचिन अंकुश यादव, गणेश दिगंबर बनसोडे, विजय भानुदास जगताप, विकास हरी यादव, नानासोर रामचंद्र मंडले, बाळासाहेब मिसाळ, संभाजी मल्हारी मंडले, सिद्धार्थ विश्वनाथ बनसोडे आणि शिवाजी राम मिसाळ (सर्वजण राहणार वरकुटे-मलवडी) या 11 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख 12 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

 सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, अमर नारनवर देवानंद खाडे, रूपाली फडतरे, जगन्नाथ लुबाळ, नवनाथ शिरकुळे, सतीश जाधव, श्रीकांत सुद्रिक यांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला