महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद

केरळमधून सात जण ताब्यात, सातारा पोलिसांची कारवाई

भुईंज : पुणे- बंगळूर महामार्गावर कामोठे ते विटा रक्कम घेऊन जाणाऱ्या सोने व्यापाऱ्याला शनिवारी (ता. १२) वेळे येथे दरोडा टाकून लुटले होते. यामध्ये तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे २० लाख रुपये लंपास केले होते.

 याप्रकरणी सात जणांना भुईंज व सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केरळ राज्यात ताब्यात घेतले आहे. याबाबत विशाल पोपट हासबे (वय ३०, रा. हिवरे ता. खानापूर) यांनी भुईंज पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून विनीत ऊर्फ राजन राधाकृष्ण (वय ३०), नंदकुमार नारायणस्वामी (वय ३२), अजित कुमार (वय २७), सुरेश केसावन (वय ४७), विष्णू क्रिशनंकुट्टी (वय २९), जिनू राघवन (वय ३१), कलाधरण श्रीधरन (वय ३३, सर्व रा. जि. पलक्कड, केरळ) या सात संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल असा एकूण ३५ लाख २६ हजार ९९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अद्याप सहा जण फरारी आहेत.

 पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वेळे (ता. वाई) हद्दीत शनिवारी (ता. १२) मध्यरात्री विट्यातील विशाल हासबे या सोने व्यापाऱ्यासह अन्य दोघांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे २० लाख रुपयांची रोकड दरोडेखोरांनी लंपास केली होती, तसेच त्या तिघांचे अपहरण करून अन्य ठिकाणी सोडले होते. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली होती.

 घटनेची माहिती समजताच पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी घटनास्थळी पाहणी करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर व भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार संयुक्त कारवाई करत सहायक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे व भुईंजचे पोलिस उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथके सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत रवाना केली, तसेच नाकाबंदी करण्यात आली.

 दरम्यान, गुन्हात वापरलेली वाहने सांगली जिल्ह्यात विटा, तासगाव बाजूस गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार योगेवाडी (ता. तासगाव, जि. सांगली) येथून मुख्य संशयित विनीत ऊर्फ राजन यास ताब्यात घेण्यात आले व अन्य संशयितांच्या शोधासाठी पथके केरळ राज्यात रवाना झाली. केरळ पोलिसांच्या मदतीने सहा संशयित व गुन्ह्यात वापरलेली चारचाकी (केएल १० एजी ७२००) वायनाड (केरळ) येथून ताब्यात घेतली. त्यानंतर कऱ्हाड शहर पोलिसांच्या पथकाने केरळमध्ये जाऊन दुसरी चारचाकी (केएल ६४ एम २७९७) ताब्यात घेतली

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला