सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
Satara News Team
- Tue 8th Jul 2025 09:34 am
- बातमी शेयर करा

|| श्री स्वामी समर्थ ||
मेष - नफा मिळू शकतो
आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा संमिश्र आहे. जे लोक बिझनेस करतात त्यांच्यासाठी दिवस फारसा चांगला नाही. पण तुमच्या जुन्या योजनांमधून तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. त्यामुळे तुमचा खर्च भागेल. तुम्ही जॉबच्या ठिकाणी चांगलं काम करून दाखवनार आहात. तुमच्या योग्यतेनुसार काम मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. धार्मिक कामांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल त्यामुळे लोकांमध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार होईल. कोणताही बिझनेस भागीदारीत करणे तुमच्यासाठी फायद्याचे राहील. आज तुमचे भाग्य ८४% तुमच्या बाजूने आहे. मुंग्यांना पीठ टाका.
वृषभ - ताण घेऊ नका
आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. काही समस्या असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे वेळीच डॉक्टरांना दाखवा. महत्त्वाच्या कामांची यादी तयार करा. कोणताही करार करताना विचारपूर्वक सही करा. कामाच्या ठिकाणी जास्त ताण घेऊ नका. धोकादायक कामांपासून दूर राहा. आज तुमचे भाग्य ६६% तुमच्या सोबत आहे. श्री शिव चालीसा वाचा.
मिथुन - नेतृत्व क्षमता वाढेल
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जमिनीच्या कामात जरा जपून राहा. बिझनेस मध्ये योजना विचारपूर्वक करा. कुटुंबात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. सगळ्यांचा मान-सन्मान करा नाहीतर तुम्हाला त्रास होऊ शकतो. एका ध्येयावर लक्ष केंद्रित केले तरच तुमचे काम पूर्ण होईल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढेल. आज तुमचे भाग्य ७२% तुमच्या सोबत आहे. सूर्य देवाला अर्घ्य द्या.
कर्क - निर्णय विचारपूर्वक घ्या
आज तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. जे लोक सरकारी नोकरी करतात, त्यांनी आपल्या ऑफिसमधील मोठ्या अधिकाऱ्यांशी वाद घालू नये नाहीतर नुकसान होऊ शकतं. बिझनेस संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. पैशांच्या बाबतीत कोणा बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेऊ नका. विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ त्यांना नक्की मिळेल. आज तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता जे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकतात. आज तुमचे भाग्य ९२% तुमच्या सोबत आहे. विष्णू मंदिरात चण्याची डाळ आणि गूळ पिवळ्या कपड्यात बांधून दान करा.
सिंह - रखडलेले काम पूर्ण होऊ शकते
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्हाला काही नवीन योजनांचा फायदा होईल. जॉबच्या ठिकाणी विचारपूर्वक काम करा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. तुमचे रखडलेले काम आज पूर्ण होऊ शकते. तुम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. तुमच्या पत्नीचा/नवऱ्याचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरी भेटायला घेऊन जाऊ शकता. आज तुमचे भाग्य ९३% तुमच्या सोबत आहे. सकाळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा.
कन्या - गाडी घेण्याची इच्छा पूर्ण होईल
आज तुम्हाला सुखसोयी मिळतील. नवीन गाडी घेण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. तुम्ही सगळ्यांचे भले करण्याचा विचार कराल. काही महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करावी लागतील. घरातील समस्या कोणाला सांगू नका नाहीतर लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. तुम्ही तुमच्या मुलांना काही जबाबदारी दिली तर ते ती व्यवस्थित पार पाडतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी दूर होतील. आज तुमचे भाग्य ८२% तुमच्या सोबत आहे. गणपतीला दुर्वा अर्पण करा.
तूळ - नफा कमवू शकता
आज तुमच्यात आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्हाला मोठं पद मिळू शकतं ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुम्हाला काही चर्चांमध्ये भाग घ्यावा लागेल. सरकारी योजनांमध्ये सहभागी होऊन तुम्ही चांगला नफा कमवू शकता.कोणतेही काम करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या.नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही स्वतःच्या कामापेक्षा दुसऱ्यांच्या कामात जास्त लक्ष द्याल त्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकतं. बिझनेस मध्ये फायदा झाल्यास तुम्हाला आनंद होईल. आज तुमचे भाग्य ६५% तुमच्या सोबत आहे. श्री गणेश चालीसा वाचा.
वृश्चिक - घरात आनंदी वातावरण राहील
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्याच्या लग्नाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकतो ज्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. तुम्हाला गिफ्ट मिळू शकतात. तुम्ही आज आपल्या परंपरांचे पालन कराल. नवीन लोकांशी तुमचे संबंध सुधारतील. कोणतेही काम आत्मविश्वासाने करा त्यामुळे ते नक्कीच पूर्ण होईल. तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज तुमचे भाग्य ७१% तुमच्या सोबत आहे. पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि शंकराला तांब्याच्या लोट्यातून जल अर्पण करा.
धनु - अपेक्षा पूर्ण कराल
आज तुम्ही नवनवीन गोष्टींमध्ये सक्रियता दाखवाल. तुमचे सहकारी तुम्हाला बघून खूप खुश होतील. तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण कराल. जर तुम्ही कोणाला वचन दिले असेल तर ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न कराल. बोलताना आणि वागताना गोडवा ठेवा. तुमच्यातील कलात्मक गुण लोकांसमोर येतील. बिझनेस करणाऱ्या लोकांना जुन्या योजनांमधून फायदा होईल. आज तुमचे भाग्य ७३% तुमच्या सोबत आहे. गाईला गूळ खाऊ घाला.
मकर - खर्चावर नियंत्रण ठेवा
आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही धार्मिक कार्यांमध्ये सहभाग घ्याल. पण तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा नाहीतर तुम्हाला समस्या येऊ शकतात. तुमच्या काही चुकांमधून तुम्हाला शिकायला मिळेल. जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना चांगली बातमी मिळू शकते. बिझनेसच्या कामासाठी तुम्हाला लांबचा प्रवास करावा लागू शकतो. घरातील मोठ्या माणसांशी वाद घालू नका. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. आज तुमचे भाग्य ६२% तुमच्या सोबत आहे. भगवान विष्णूची पूजा करा.
कुंभ - आरोग्याची काळजी घ्या
बिझनेस करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला आज नवीन मार्गांनी पैसे मिळतील ज्यामुळे तुमची कमाई वाढेल. तुमच्या घरातील समस्या आज दूर होतील. आरोग्याची काळजी घ्या. काही महत्वाच्या कामांमध्ये अडचणी येऊ शकतात त्यामुळे ती कामे वेळेत पूर्ण करा. तुम्हाला सरकारी कामातून फायदा मिळू शकतो. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. आज तुमचे भाग्य ६९% तुमच्या सोबत आहे. बजरंग बाण वाचा.
मीन - सकारात्मक विचार ठेवा
आज तुम्ही तुमच्या इन्कम आणि खर्चामध्ये बॅलन्स ठेवा. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येतील पण तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्या दूर करू शकाल. आज तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता त्यामुळे जरा सावध राहा. सकारात्मक विचार ठेवा. तुम्हाला तुमच्या माहेरच्या लोकांकडून आर्थिक मदत मिळू शकते. खर्चावर लक्ष ठेवा नाहीतर तुम्हाला नंतर त्रास होऊ शकतो. जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळू शकतात.
आज तुमचे भाग्य ८९% तुमच्या सोबत आहे. भगवान विष्णूला बेसनच्या लाडूचा प्रसाद दाखवा.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Tue 8th Jul 2025 09:34 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Tue 8th Jul 2025 09:34 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Tue 8th Jul 2025 09:34 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Tue 8th Jul 2025 09:34 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Tue 8th Jul 2025 09:34 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Tue 8th Jul 2025 09:34 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Tue 8th Jul 2025 09:34 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य ३/६/२०२५ गुरुवार
- Tue 8th Jul 2025 09:34 am