‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात

दहिवडी : सुखकर्ता को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड,मुंबई यांच्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन जनरल मॅनेजर एकनाथ माळी,संचालक संजय घोडे,सर्जेराव घोडे,अमर जाधव,शिवाजी मोहिते,नूतन माळी यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.


यावेळी वर्धापन दिनाचे औचित्य साधून नाडी परीक्षण,मॅग्नेटिक एनलायझर मशीन च्या साह्याने मोफत आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी यासारखे उपक्रम राबवण्यात आले. सुखकर्ता को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तानाजी मोहिते यांच्या माध्यमातून स्थापन करण्यात आलेल्या या पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास राज्यात २२ शाखांच्या माध्यमातून ६५ कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.२०२५-२६ या आर्थिक वर्षात ३० शाखांचा टप्पा पुर्ण करणार आहे.४६ कोटींचे कर्ज वाटप केले आहे.५००० कोटींचे उद्दीष्ट असून त्याकडे खातेदारांच्या माध्यमातून वाटचाल सुरू आहे.

जत,कवटेमहांकाळ,दहिवडी,वाई,सांगोला या ठिकाणी नव्याने शाखा स्थापन करणार असल्याचे मत जनरल मॅनेजर एकनाथ माळी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी शाखा मॅनेजर जीवन अवघडे,ज्योत्स्ना वाघमारे,दिग्विजय मोरे कॅशियर प्रियांका कणसे,अमित धुमाळ यांच्यासह कर्मचारी,ठेवीदार,कर्जदार,खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला