गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
सातारा तालुका पोलीस ठाणेची धडाकेबाज कामगिरी 12 लाख 81 हजार 275 रुपयांचा गांजा जप्तSatara News Team
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई केलेली असून पाली ता. जि. सातारा गावाच्या हद्दीत बेकायदेशीर गांजाची लागवड केले असल्याची गुप्त माहिती सहाय्यक फौजदार धनाजी वायदंडे यांना मिळाली होती. या अनुषंगाने सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री निलेश तांबे यांनी टीम तयार करून पाली तालुका सातारा या ठिकाणी कारवाई केली असता पाली या गावांमध्ये गट नंबर 23 मधील सुमारे 30 गुंठे क्षेत्रात असलेल्या गव्हाच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजा या पिकाची लागवड केल्याचे आढळले. दरम्यान सदर पिक हे गांजाचे असल्याची पडताळणी करून सुमारे 51 किलो 275 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून याची बाजारभावानुसार 12 लाख 81 हजार 275 इतकी किंमत होत असून सातारा तालुका पोलीस ठाणे येथे एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजाची लागवड करणारा संशयित आरोपी नामदेव लक्ष्मण माने वय-42 वर्षे रा पाली . ता जि सातारा यास अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन काटकर करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा, तुषार दोशी, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा श्री राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी श्री निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि विनोद नेवसे, सपोनि सुदर्शन काटकर, सफी धनाजी वायदंडे, पोहवा मनोज गायकवाड, पोहवा राजु शिखरे, पोहवा पंकज ढाणे, पोहवा दादा स्वामी, पोहवा सतिश बाबर, पोहवा प्रदीप मोहिते, पोहवा मालोजी चव्हाण, पोहवा किरण जगताप, पोकों संदिप पांडव, पोकॉ सुनिल भोसले, पोकॉ सचिन झनकर तसेच फॉरेन्सिक पथकातील सपोनि रुपाली मोरे, पोहवा मोहन नाचण, पोहवा प्रशांत ताटे, पोहवा मारुती अडागळे, पोकॉ अमोल निकम यांनी केलेली आहे.
सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे श्री. तुषार दोशी, पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री राजीव नवले, मा. उपविभागीय अधिकारी सातारा विभाग, सातारा यांनी कौतुक व अभिनंदन केले
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 9th Jan 2026 12:12 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 9th Jan 2026 12:12 pm












