पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद

सातारा : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर सुटून तब्बल चार वर्षांपासून फरार असलेल्या भरत कांतीलाल ओसवाल (रा. गुलमोहर कॉलनी, शाहूपुरी, सातारा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शाहूपुरी चौकातून अटक केली. त्याला पुढील कारवाईसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भरत ओसवाल हा खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असून, १४ मे २०२० रोजी ४५ दिवसांच्या पॅरोल रजेवर कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. कोविड-१९ काळात त्याने टप्प्याटप्प्याने रजा वाढवून घेतली. मात्र, १९ मे २०२२ रोजी कारागृहात परत हजर राहणे बंधनकारक असतानाही तो परतला नाही. त्यामुळे त्याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत (पूर्वीच्या भादंवि कलम १७२ व २२४) गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने त्याचा माग काढणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. गुप्त माहिती, नातेवाईक व मित्रांच्या हालचालींवर ठेवलेल्या लक्षामुळे अखेर १ जुलै रोजी तो शाहूपुरी चौकात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने कारवाई करत भरत ओसवाल याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, पृथ्वी जाधव, रोहित निकम आणि महेश निर्मळ यांनी केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी पथकाचे अभिनंदन केले.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला