सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
दोन गुन्ह्यांमध्ये तिघांना अटक; जिलेटीन कांड्या, डिटोनेटर्स व अमोनियम नायट्रेटचा मोठा साठा हस्तगतSatara News Team
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
- बातमी शेयर करा
सातारा, : सातारा शहर पोलिस, वडूज पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्तरीत्या केलेल्या धडक कारवाईत बेकायदेशीररित्या साठवून ठेवलेला व विक्रीसाठी आणलेला स्फोटक पदार्थांचा मोठा साठा जप्त केला आहे. या दोन स्वतंत्र कारवायांमध्ये एकूण १८ लाख ९५ हजार ३५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी एका संशयिताचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
शहर पोलिसांची कारवाई
सातारा शहर पोलिसांनी दगडी खाण परिसरात छापा टाकून शिवराज बलदेव चौधरी (रा.खिंडवाडी ता. सातारा, मूळ राजस्थान) याच्याकडून बेकायदेशीर स्फोटकांचा साठा जप्त केला. तपासादरम्यान त्याच्याकडून ४८० किलो अमोनियम नायट्रेट, २,४२३ जिलेटीन कांड्या आणि १,९५० डिटोनेटर्स असा सुमारे १ लाख ८५ हजार २५८ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
वडूज पोलिसांची संयुक्त कारवाई
दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि वडूज पोलिसांनी मायणी परिसरात टाटा ट्रक व दोन बोलेरो वाहनांवर छापा टाकला. वाहनांमधून ९,८०० जिलेटीन कांड्या, विविध प्रकारचे डिटोनेटर्स, कॉर्डेक्स वायर व सेफ्टी फ्यूज असा सुमारे १७ लाख १० हजार १०० रुपयांचा स्फोटकसाठा जप्त करण्यात आला.
या कारवाईत विशाल जाट आणि बाबूलाल जाट यांना अटक करण्यात आली असून, शंकर बेनीराम चौधरी हा संशयित फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
तपास सुरू
दोन्ही गुन्ह्यांमधील आरोपींचा परस्पर संबंध उघडकीस आला असून, त्यांच्याकडून बेकायदेशीर स्फोटकांची वाहतूक व विक्रीचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सातारा शहर पोलिस, वडूज पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
सदर कारवाई श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो., सातारा विभाग राजीव नवले, स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोनि. सचिन म्हेत्रे, सातारा तालुका पोलीस ठाणे पोनि. निलेश तांबे तसेच वडूज पोलीस स्टेशनचे श्री. धनश्याम सोनवणे, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा शहर पोलीस ठाणे व सातारा तालुका पोलीस ठाणे डी.बी. पथकातील अंमलदार, बीडीडीएस पथक आणि फॉरेन्सिक युनिटने सहभाग घेतला. उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
संबंधित बातम्या
-
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
मुंबईत गुन्हा, जावळीत लपाछपी; बॉलिवूड दिग्दर्शक नुरानीचा ‘फार्महाऊस प्लॅन’ मेढा पोलिसांनी उधळला!
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
फलटण नगरपरिषदेत कर वसुलीतील कथित अपहार उघड; संगणक परीचारकास अटक
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने 'थार' लांबवणारा भामटा जेरबंद
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Mon 29th Jun 2026 07:38 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Mon 29th Jun 2026 07:38 pm












