फलटण उपजिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा खळबळ . (एका डॉक्टरची सुसाईड नोट वायरल.)

फलटण. फलटण शहर व फलटण शहरातली असणारे उपजिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा हादरले असून उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या एका डॉक्टरला माजी मंत्र्याच्या पी ए ने अरेरावी करून धमकावल्याने मोठी खळबळ उडाल्याची माहिती समोर येत आहे. 

फलटण शहरात असणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयात फिटनेस प्रमाणपत्राच्या वादातून सुसाईड नोट लिहिण्याचा दावा करणारी एक कथित पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. 

या कथेत नोटमध्ये राज्य सरकारचा एका माजी मंत्र्याच्या पीए ने धमकी दिल्याचा आरोप करत या कधीच डॉक्टरने सुसाईड नोट लिहून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. 

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार संबंधित डॉक्टर हा सोलापूर जिल्ह्यातील असून दोन वर्षापासून फलटणमधील उपजिल्हा रुग्णालय कार्यरत आहे. 

बंदुकीच्या परवान्यासाठी डॉक्टर कडून फिटनेस प्रमाणपत्राच्या संदर्भात दोघांच्या मध्ये वाद होऊन डॉक्टरला अरेरावी करून वरिष्ठांच्या कडे तक्रार केली आहे आणि त्याच्या सुरक्षा दक्षता कडून मारण्याची धमकी दिल्याचा आरोप या सुसाईड नोट मध्ये करण्यात आला आहे. 

या कथित प्रकरणामुळे रुग्णालयातील वातावरण ढवळून निघाले असून प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुसाईड नोट चे छायाचित्र व्हायरल झाल्याने सातारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 

(या कथित प्रकरणाची अधिकृत तक्रार नाही आणि कोणताही दुजोराही नाही).

या खळबळ जनक प्रकाराची फलटण पोलीस ठाण्यात अजून तरी कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नसून उपजिल्हा रुग्णालय प्रशासन जिल्हा शल्यचिकित्सक यांचेकडून आणि पोलिसांकडूनही कोणताही अधिकृत दुसरा देण्यात आलेला नाही. 

या कथित डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या मजकुरात संशयास्पद मृत्यू झाल्यास एका जबाबदार व्यक्तीचे नाव लिहिण्याचा दावाही केला आहे.

या कथित प्रकरणाचा सुसाईड नोट च्या प्रामाणिकपणाची तपासणी होणे गरजेचे असून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी होणे गरजेचे आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला