आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
Satara News Team
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा तालुक्यातील शिवथर येथे गावाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या अश्या अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन रयत क्रांती संघटनेचे नेते आ. सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. “विकास फक्त शहरापुरता नको, तर गावाच्या प्रत्येक वाडीत पोहोचला पाहिजे” या ठाम भूमिकेतून आम्ही सातत्याने ग्रामीण भागात मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
त्याचबरोबर ग्रामीण जनतेला सुरक्षित, सुकर व चांगल्या दर्जाच्या रस्त्यांची सुविधा मिळावी, हाच आमचा प्रामाणिक उद्देश असून, त्या दृष्टीने गावागावात निधी उपलब्ध करून विकासकामे मार्गी लावली जात आहेत. असा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला.
या भूमिपूजन प्रसंगी ऊस दर नियंत्रण समितीचे सदस्य सचिन नलावडे, रयत क्रांती संघटनेचे कार्यकर्ते किरण उथळे, सातारा जिल्हा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष मधुकर जाधव, रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश (सोनू) साबळे, शिवथर गावच्या सरपंच प्रिया साबळे, उपसरपंच दत्तात्रय साबळे, यांच्यासह असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Thu 8th Jan 2026 02:50 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Thu 8th Jan 2026 02:50 pm











