कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!

आंदोलनाचा इशारा,समिती आक्रमक भूमिकेत. संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी,कार्याध्यक्ष मकरंद करळे, उपाध्यक्ष दिग्विजय पाटील व सुधीर कांबळे यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत, समितीने स्पष्ट शब्दांत सांगितले कि, "जर तातडीने व्यवस्थेत सुधारणा झाली नाही, तर रुग्णांच्या हक्कांसाठी महाराष्ट्र संघर्ष समिती तीव्र आंदोलन छेडेल."असा इशारा यावेळी देण्यात आला.

पुसेसावळी : कराड उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवा, स्वच्छता, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि अत्यावश्यक उपचारांची व्यवस्था यांचा अत्यंत दयनिय व बेफिकीर कारभार समोर आला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी कराड येथील उपजिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनीला लेळे यांच्याशी याबाबत सविस्तर चर्चा केली.सदर रुग्णालय कराड शहर व ग्रामीण मिळून सुमारे १२ ते १५ लाख लोकसंख्येवर उपचार करणारे मुख्य शासकीय रुग्णालय आहे, मात्र प्रत्यक्षात तेथील व्यवस्थापन अत्यंत दुर्लक्षित असल्याचे समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

 स्वच्छता शून्य, डॉक्टरांचा ठावठिकाणा नाही रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छतेचा पूर्ण अभाव आढळून आला. अनेक ठिकाणी कचरा, अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त बाथरूम्स यामुळे रुग्ण आणि नातेवाईक त्रस्त दिसून आले.तसेच ड्युटीवर हजर असणे आवश्यक असलेल्या डॉक्टर व स्टाफमधील अनेक कर्मचारी अनुपस्थित होते, वेळेवर उपस्थितीचे कोणतेही व्यवस्थापन दिसून आले नाही. वैद्यकीय अधीक्षकांचे नियंत्रण पूर्णतः निष्क्रिय असल्याची स्पष्ट झलक पाहायला मिळाली. 

 कराड उपजिल्हा रुग्णालयात फक्त २ डायलिसिस मशीन उपलब्ध असून, अपुरी डायलिसिस यंत्रणा आणि धोकादायक स्थितीत एकच टेक्निशियन दोन्ही यंत्रं चालवतो, यामुळे रुग्णांच्या जीवाशी थेट खेळ केला जात आहे. त्याशिवाय डायलिसिससाठी आवश्यक असणाऱ्या 'डायलायझर'चा नियमित व आवश्यक प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे देखील संघर्ष समितीच्या निदर्शानास आले.


‘प्रशासनाला झोपेतून जागं करण्याची वेळ आली आहे.
.. संघर्ष समितीचे अध्यक्ष शाकीर तांबोळी यांनी सांगितले की, "जनतेसाठी असलेली शासकीय आरोग्य यंत्रणा जर स्वतःची जबाबदारी झटकत असेल, तर आम्ही शांत बसणार नाही. कराड उपजिल्हा रुग्णालयातील स्थिती ही एक ‘आरोग्य धोरणातील अपयश’ आहे. याबाबत प्रशासनाकडून आवश्यक आणि योग्य त्या सुचनप्रमाणे बदल केले गेले नाहीत, तर महाराष्ट्र संघर्ष समिती प्रशासनाला जागं करण्यासाठी रस्त्यावर उतरेल."
आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला