जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील तीन रुग्ण कराड येथे, तर एक महिला रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होती. संबंधित ७० वर्षीय वृद्धेवर गेल्या तीन दिवसांपासून व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारदरम्यान शनिवारी दुपारी त्या वृद्धेचा मृत्यू झाला. संबंधित महिलेला काही वर्षांपूर्वीसुद्धा कोरोना झाला होता. दुसऱ्यांदा त्या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्या महिलेला डायबेटिस आणि फुफ्फुसाचा आजारही होता, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी सांगितले.

 कऱाड येथे उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांची प्रकृती ठणठणीत आहे. त्या रुग्णांना इतर कोणताही त्रास नाही. या कोरोनाची वेगळी अशी कोणतीही लक्षणे नाहीत. सर्दी, ताप, खोकला, कणकण अशी लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सध्याच्या डॉक्टरांनी कोरोना काळामध्ये चांगले काम केले आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेचा डॉक्टरांना अनुभव आहे. नागरिकांनी लसीकरण केलेले असल्यामुळे तसेच सध्या नागरिकांमधली प्रतिकारशक्तीही वाढलेली आहे. त्यामुळे भीती बाळगू नये. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. पूर्वी कोरोनामध्ये आपण ज्याप्रमाणे काळजी घेत होतो. त्याप्रमाणे काळजी घ्यावी. मास्क वापरावा, साबणाने हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहनही आरोग्य विभाकडून करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला