आखेर सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव; दोन रुग्ण स्पष्ट, एक व्हेंटिलेटरवर
Satara News Team
- Fri 30th May 2025 10:14 am
- बातमी शेयर करा
सातारा : जिल्ह्यात अडीच वर्षानंतर कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. गुरूवारी दोन रुग्ण निष्पन्न झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालय आणि कराडमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर यातील एकाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली.
जिल्ह्यात २०२० मध्ये कोरोनाचा प्रथम शिरकाव झाला. त्यानंतर दोन वर्षे कोरोनाने दोन लाखांहून अधिकजण बाधित झाले होते. तसेच अनेकांचा मृत्यूही झालेला. मात्र, २०२२ च्या उत्तरार्धापासून कोरोना रुग्ण सापडणे थांबले होते. पण, अडीच वर्षानंतर पुन्हा कोरोनाचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या दोन रुग्ण निष्पन्न झाले आहेत
एकावर सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या व्यक्तीवर कराडमधील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात एक स्वतंत्र वाॅर्ड तयार करण्यात आलेला आहे
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Fri 30th May 2025 10:14 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Fri 30th May 2025 10:14 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Fri 30th May 2025 10:14 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Fri 30th May 2025 10:14 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Fri 30th May 2025 10:14 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Fri 30th May 2025 10:14 am
संबंधित बातम्या
-
उन्हाळ्याचा वाढता प्रकोप: 'उष्माघात' टाळण्यासाठी वेळीच व्हा सावध!
- Fri 30th May 2025 10:14 am
-
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 30th May 2025 10:14 am
-
कोजागिरीचे मसालादुध कसे तयार करावे ?
- Fri 30th May 2025 10:14 am
-
सातारा शहरामध्ये तापाचे रुग्णाच्या संख्येत वाढ.दवाखाने हाऊसफुल्ल
- Fri 30th May 2025 10:14 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील बुरडाणी गावात हॉटेलला लागली मोठी आग
- Fri 30th May 2025 10:14 am
-
महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.
- Fri 30th May 2025 10:14 am
-
पुण्यात ‘झिका’चा आणखी एक रुग्ण सापडला, एकूण रुग्णसंख्या चार.
- Fri 30th May 2025 10:14 am
-
आठ तालुक्यात पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!
- Fri 30th May 2025 10:14 am













