महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच संजीवनी विठ्ठल ढेबे यांचा ह्रदयविकाराने मृत्यू.

महाबळेश्वर  : महाबळेश्वर तालुक्यातील आढाळ या गावाची उपसरपंच असलेल्या संजीवनी विठ्ठल ढेबे (वय २३, रा. आढाळ) यांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला.
या युवतीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही युवती पाचगणीहून महाबळेश्वर ला आढाळ या आपल्या गावी जाण्यासाठी निघाली असता येथील स्टेट बँक इंडियानजीक गल्लीमधून जाताना तिला अस्वस्थ वाटत होते.
ती जागेवरच कोसळली. नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिच्या नातेवाईकांचा शोध घेत त्यांना याबाबतची माहित देण्यात आली.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली युवतीचे आई वडिलांसह नातेवाईक व ग्रामस्थांनी रुग्णालय परिसर गर्दी केली होती.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला