व्याजाने का होईना जरातरी सुख दे शेतकऱ्यांची देवाकडे मागणी
ढेबेवाडी ता.पाटण येथे वळीव पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान.विजया माने
- Mon 26th May 2025 08:10 pm
- बातमी शेयर करा

कराड : गेले आठ दिवस ढेबेवाडीसह परीसरात वळीव पाउसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल जाले आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १५ मे पासुन हवामानात बदल झाला असुन अचानक काळे ढग जमा होउन तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पावसाला सुरवात झाली आहे त्यामुळे सरासरी आर्धा तास कोसळणार्या पावसाने बुधवार पासुन सलग कोसळायला सुरवात केली .त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी अशी परीस्थीती झाली आहे . अनेक ठीकाणी गेले आठ दिवस ढेबेवाडी ता.पाटण येथे पावसाची संततधार पडत आहे.
शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवलेला चारा वळीव पावसाने पुर्णपणे भीजल्याने जनावरांच्या चाऱ्यांचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे.तर अवघ्या काही दिवसावर उन्हाळ्यातील पीक काढणी आली असताना उन्हाळी भुयमुंग, हँबरीड सारख्या पीकांना अक्षरशा मोड आले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेल पीक गमावल्याने येथील शेतकरी हतबल झाला असुन . शेती करायची तरी कशी ? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.खरीपासाठी शेतकऱ्यांनी बी-बीयाने,खाते याचे नियोजन केले असले तरी खरीप पीकासाठी शेती कधी तयार होईल या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. कारण शेतात पाणीच पाणी शेतीच्या मशागतीची कामे खोंळंबली शेतात घात यायला १५ दिवस लागतील.अशात आवकाळी संपतनाही तोच मान्सुन सक्रीय होत असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्वतवल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.
मग पेरणी करायची कधी ?
हवामान खात्याचा अंदाज पहाता सध्या पाटण तालुक्यासह राज्यभरातील शेतकऱ्यांनावर ओल्या दुष्काळाच सावट आहे.संबंधीत विभागाने वळीव पावसाने झालेल्या पीकनुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना भरपाई करुण ध्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Mon 26th May 2025 08:10 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Mon 26th May 2025 08:10 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Mon 26th May 2025 08:10 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Mon 26th May 2025 08:10 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Mon 26th May 2025 08:10 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Mon 26th May 2025 08:10 pm
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Mon 26th May 2025 08:10 pm
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Mon 26th May 2025 08:10 pm