औंधच्या मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत कोसळली.

सुदैवाने जिवीतहानी नाही. भाविकांनी डोंगरावर जाताना खबरदारी घ्यावी.

औंध: : लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंध ता खटाव येथील श्री मूळपीठ डोंगरावरील संरक्षक भिंत सोमवारी रात्री कोसळली.सुदेवाने यामध्ये कसलीही जिवीतहानी झाली नाही. 


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की औंध येथील मूळपीठ डोंगरावर जाताना शेवटच्या वळणावर (गणेशवाडी बाजूची) असलेली संरक्षक भिंत खचली होती परंतु दिसून येत नव्हती.गेल्या आठवड्यात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे ती आणखीनच खचल्याने सोमवारी रात्री कोसळली.अंदाजे ही भींतींची लांबी 30 मीटर आहे.भींती लगत सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने कामगार काम करतात.. दिवसा भींत कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने काम बंद होते.भींत पडल्यामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे.

 भाविकांनी दर्शनासाठी जाताना काळजी आणि खबरदारी घ्यावी असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे वतीने करण्यात आले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने याकडे लक्ष देऊन संरक्षक भिंतीचे काम करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी
anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला