दहिवडी कुळकजाई रस्ता वाहतुकीसाठी बंद ; शिंदी खुर्द चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटचा रस्ता खचला....

आंधळी, :   माण तालुक्यातील दहिवडी कुळकजाई जाणाऱ्या रस्ता शिंदी खुर्द नजीक ओढ्यावर चालू असलेल्या पूलाच्या कामामुळे साईटला काढून दिलेला कच्चा रस्ता वाहून गेला असल्यामुळे दहिवडी कुळकजाई जाणारी वाहतूक बंद करण्यात आले आहे.


 दहिवडी पोलीस ठाण्याचे अंमलदार यांनी त्याठिकाणी तत्पर जाऊन पाहणी करत रस्ता वाहतूक साठी बंद केला. माण तालुक्यात गेल्या चार-पाच दिवस झाले सलग सतत धार पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी ओढून आले भरून वाहू लागले आहे. कुळकजाई जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील शिंदी खुर्द मधील ओढ्याला आज सकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आल्याने रस्त्यावरील पूलाच्या काम चालू असून साईटला काढून दिलेला रस्ता वाहू लागल्याने तत्पर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. दहिवडी कुळकजाई बूध जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे वरील जवळपास अनेक गावांचा संपर्क ह्या रस्त्याशी येत असून संबंधित ठेकेदार यांनी तातडीने रस्तावरील असणाऱ्या पुलाचे काम करून रस्ता चालू करावा अशी मागणी जनतेतून होत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त