अजिंक्यतार्यावर मध्यरात्री स्ट्राईक... पायथ्यालगतचे अनाधिकृत थडगे हटवले
Satara News Team
- Sat 31st May 2025 08:13 am
- बातमी शेयर करा

सातारा : किल्ले अजिंक्यतारा पायथ्यालगत असलेेले अनधिकृत थडगे सातारा नगरपालिकेने गुरुवारी मध्यरात्री हटवले. काळोख्या रात्री केलेल्या या स्ट्राईकद्वारे हे अतिक्रमण काढले असून, यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, या ठिकाणी पाण्याची टाकी बांधली जाणार असल्याने तो परिसर साफ करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या तीन वर्षांपासून सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये किल्ले, गड तसेच अतिक्रमण केलेल्या जागांवरील बांधकामावर हातोडा टाकण्याचे काम सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रतापगडावरील अफजल खानाच्या कबरीचे उदात्तीकरण व अतिक्रमण केलेली जागा अडीच वर्षांपूर्वी पोलिस बंदोबस्तात पहाटेच भुईसपाट करण्यात आली होती त्यानंतरही गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे प्रशासनाच्या रडारवर होती.
सातार्यातील अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला व मंगळाई देवीकडे जाताना उजव्या बाजूला लागणार्या परिसरात बर्याच वर्षांपासून असलेले थडगे होते. राज्यातील गडकिल्ल्यांवर असलेली अतिक्रमणे दि. 31 मेपर्यंत हटवण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सातारा नगरपालिकेने जाहीर नोटीस प्रसिद्ध करून संबंधित अनधिकृत थडग्याबाबत पुरावे सादर करण्याचे आवाहन केले होते. मात्र याबाबत नगरपालिकेशी कुणी व्यक्ती किंवा संस्थेने पुरावे सादर केले नाहीत. त्यामुळे गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाने ही धडक कारवाई केली.
रात्री सुमारे 60 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त मिळण्याचे निश्चित झाल्यानंतर सातारा पालिकेने अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह जेसीबी व लागणारे सर्व साहित्य घेतले. रात्री 11 वाजता या जागेच्या परिसरात पोलिसांनी पूर्ण वेढा दिला. पोलिसांचा बंदोबस्तानंतर पालिकेने थडगे काढण्याची मोहिम राबवली. सुमारे एक तास ही मोहिम सुरु होती. यामध्ये पूर्ण जागा भुईसपाट करण्यात आली. या कारवाईत थडग्याखाली कोणत्याही प्रकारचे अवशेष सापडलेले नाहीत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 31st May 2025 08:13 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 31st May 2025 08:13 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 31st May 2025 08:13 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 31st May 2025 08:13 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 31st May 2025 08:13 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 31st May 2025 08:13 am
संबंधित बातम्या
-
ऐतिहासिक निर्णयांनी उत्साहात पार पडली वडी गावातील विशेष ग्रामसभा
- Sat 31st May 2025 08:13 am
-
‘सुखकर्ता’च्या वडूज शाखेचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात
- Sat 31st May 2025 08:13 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस....
- Sat 31st May 2025 08:13 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ८/७/२०२५ मंगळवार
- Sat 31st May 2025 08:13 am
-
कराड उपजिल्हा रुग्णालयातील अव्यवस्थेवर संघर्ष समितीचे ताशेरे – सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा!
- Sat 31st May 2025 08:13 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ७/७/२०२५ सोमवार
- Sat 31st May 2025 08:13 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य शनिवार दि. ०५ जुलै २०२५
- Sat 31st May 2025 08:13 am
-
सातारा न्यूज राशिभविष्य आज ४/७/२०२५ शुक्रवार
- Sat 31st May 2025 08:13 am