नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
Satara News Team
- Mon 9th Jun 2025 10:37 am
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर नागठाणे, ता. सातारा येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील बापलेकीचा दुर्देवी मृत्यू झाला. हा अपघात रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास झाला. मृत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील रहिवासी आहेत. इब्राहिम हसन शेख (वय ३८), मेहेक इब्राहिम शेख (वय १२ दोघेही रा. जवुळके खुर्द रेटवडी, ता. खेड, जि. पुणे) अशी अपघातात ठार झालेल्या बापलेकीचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इब्राहिम शेख हे त्यांच्या लहान मुलीसह दुचाकीवरून नागठाणे येथे निघाले होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने शेख यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.
या अपघातानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान बापलेकीचा मृत्यू झाला. टेम्पो चालक आसीफ नैमुद्दीन सय्यद (वय ३०, रा. सय्यद नगर हडपसर पुणे) याच्यावर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 9th Jun 2025 10:37 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 9th Jun 2025 10:37 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 9th Jun 2025 10:37 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 9th Jun 2025 10:37 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 9th Jun 2025 10:37 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 9th Jun 2025 10:37 am
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 9th Jun 2025 10:37 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 9th Jun 2025 10:37 am













