पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.

पुसेसावळी    :  पुसेसावळी ग्रामपंचायत हद्दीतील विटा रस्त्यावर एम.एस.ई.बी.च्या कार्यालया शेजारील पाटबंधारे विभागाच्या विना वापर बंद अवस्थेत असलेल्या खोल्यांपैकी एका खोलीत पुसेसावळी येथील २० वर्षीय युवकाने दोरीने गळफास घेऊन जिवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पुसेसावळी सह परिसरातील युवक आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी माहिती मिळताच औंध पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनिल शिरोळे, पुसेसावळी दुरक्षेत्राच्या महिला पोलिस हवालदार खाडे, पोलिस हवालदार कांबळे आणि पोलिस हवालदार रोहित खरात यांनी घटनास्थळी तातडीने भेट देत जागेवर पंचनामा करण्यात आला. 

यानंतर सदरचे मृतदेह ग्रामीण रूग्णालय,औंध येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलेले नंतर त्याचेवर अंतिम संस्कार करण्यात आले. याबाबत दिलीप गोविंद जाधव, यांनी १३ जून २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता चे पुर्वी (नक्की वेळ माहीत नाही) मौजे पुसेसावळी ता. खटाव गावचे हद्दीत एम.एस.ई.बी. ऑफिस शेजारील पडक्या खोलीत पुतण्या शुभम सुरेश जाधव वय-१९ वर्षे रा.पुसेसावळी ता.खटाव जि.सातारा हा दोरीने गळफास घेऊन मयत अवस्थेतेत मिळुन आला आहे. तरी त्याचे मयतेचा तपास व्हावा. अशी खबर दिली असून त्यानुसार औंध पोलिस स्टेशन येथे अकस्मात मयत नंबर ३४/२०२५ ने नोंद घेतली असून त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार राहुल एस.वाघ करीत आहेत.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला