अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
Satara News Team
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
- बातमी शेयर करा
सातारा : साताऱ्याचा ऐतिहासिक वारसा असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. किल्ल्यावरून साधारण २०० फूट खोल दरीत कोसळल्याने एका कामगाराचा मृत्यू झाला असून, 'शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स'च्या टीमने तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर या कामगाराचा मृतदेह बाहेर काढला आहे.
या घटनेची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्सची टीम रेस्क्यू ऑपरेशनसाठी तातडीने घटनास्थळी दाखल झाली होती. संबंधित कामगार दरीत कोसळल्याचा कॉल आल्यानंतर टीमने दोरखंड आणि जीवरक्षक साहित्यासह दरीत उतरून शोधमोहीम राबवली. मात्र, दरीची खोली आणि पडताना झालेल्या गंभीर दुखापतींमुळे त्या कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत ट्रेकर्सनी या कामगाराचा मृतदेह दरीतून वर काढला असून तो आता पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
हा कामगार नेमका कशामुळे पडला आणि तो किल्ल्यावर कोणत्या कामासाठी आला होता, याचा तपास आता पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी आणि कामगारांनी अधिक खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
स्थानिक बातम्या
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
संबंधित बातम्या
-
पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Mon 2nd Mar 2026 11:19 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Mon 2nd Mar 2026 11:19 am













