साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
Satara News Team
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
- बातमी शेयर करा

पाटण : साताऱ्यातील पाटण तालुक्यातील सडा वाघापूरचा उलटा धबधबा पाहायला गेलेल्या पर्यटकाची गाडी थेट दरीत कोसळली घटना घडली आहे. जवळपास ३०० फूट एका झाडाला कार अडकली असून कराड तालुक्यातील गोळेश्वर येथील साहिल जाधव हा 20 वर्षे युवक गंभीर जखमी झाला आहे.
गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गावर टेबल पॉईंटच्या ठिकाणी चारचाकी वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी थेट ३०० फूट खोल दरीत गेली आहे. सुदैवाने फोटोसेशनसाठी त्याच्यासोबतचे चार मित्र गाडीतून खाली उतरल्याने ते सुखरूप आहेत.
याबाबत पाटण पोलिसांनी घटनास्थळावरून दिलेली माहिती अशी, सडा वाघापूर याठिकाणी उलटा धबधबा पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटक येथे जात असतात. पाटणपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पाटण-सडावाघापूर मार्गावरील गुजरवाडी गावच्या हद्दीत घाटमार्गाच्या मधोमध सपाटीला पर्यटकांसाठी टेबल पॉईंट म्हणून पर्यटनाचे ठिकाण आहे. या टेबल पॉईंटच्या दोन्ही बाजूला खोलवर दरी आहे. याठिकाणी फोटोसेशनसाठी अनेक पर्यटक थांबत असतात
बुधवार दि. ९ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास साहिल अनिल जाधव (वय २०. रा. गोळेश्वर, ता. कराड) हे आपल्या मित्रांच्या समवेत चारचाकी (क्र. एम. एच. ५०. एक्स. ५८५९) या गाडीतून पर्यटनासाठी आले होते. टेबल पॉईंट ठिकाणी चहा घेतल्यानंतर मित्र फोटो काढण्यात व्यस्त होते. सायंकाळी ४.१५ च्या सुमारास चालक साहिल जाधव गाडी चालू करत असताना गवतावरून गाडी घसरल्याने त्यांचा गाडीवरील ताबा सुटून ते ३०० फूट खोल दरीत गाडीसह कोसळले.
यावेळी उपस्थितांनी तात्काळ पाटण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पाटण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर हे आपले कर्मचारी संतोष कुचेकर, राजेंद्र मोहिते, होमगार्ड आकाश चव्हाण, दीपक मिसाळ आदी टीमसोबत अपघातस्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याच परिसरात असलेल्या सुरूल, ता. पाटण येथील किंगमेकर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने तासाभराच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर गाडीतील जखमी युवक साहिल जाधव याला झोळीतून वर काढण्यात आले. यावेळी परिसरात बकरी चारण्यासाठी गेलेला युवक मंगेश जाधव (म्हावशी) याने सदर गाडीचा दरवाजा तोडला.
गंभीर जखमी साहिल जाधव याला उपचारकरिता सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे पाठवण्यात आले आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर करत आहेत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Wed 9th Jul 2025 10:54 pm
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Wed 9th Jul 2025 10:54 pm