कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!

कराड : गुजरात अहमदाबाद मध्ये गुरुवारी दुपारी एअर इंडियाच्या बोईंग ड्रीमलाईनर विमान कोसळण्याची मोठी दुर्घटना घडली. त्यात तब्बल २४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रवासात कराड येथील ज्योती व प्रकाश ढवळीकर यांची मुलगी कल्याणी हिचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या विमान अपघातात कराडची कन्या गमावल्यामुळे कराडकरांच्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 याबाबतची अधिक माहिती अशी की, कराड येथील सोमवार पेठ भैरवनाथ गल्लीत ज्योती व प्रकाश ढवळीकर वास्तव्य करतात. त्यांची इंजिनिअर असणारी कन्या कल्याणी हिचा विवाह अहमदाबाद येथील उद्योजक गौरवकुमार ब्रह्मभट याचे बरोबर झाला होता. ते दोघेही अहमदाबाद मध्ये राहत होते.अहमदाबाद ते लंडन प्रवासासाठी याच विमानात ते बसले होते. मात्र काळाने त्यांच्यावर घाला घातला . ब्रह्मभट दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलांना घेऊन ते दरवर्षी कराडला येत असत. यावर्षी एप्रिल महिन्यात ते कराडला आले होते. आता मुलांना केवळ गौरव यांच्या आई-वडिलांचा आधार असल्याचे सुधीर ढवळेकर या त्यांच्या नातेवाईकांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

 दरम्यान या दुर्घटनेची माहिती समजतात कल्याणीचे आई, वडील, भाऊ अहमदाबादला रवाना झाले आहेत. शुक्रवारी रात्री ही बातमी कराड शहरात पसरली. त्यामुळे कराडची एक कन्या गमावलीची हळहळ कराडकरांच्यातून व्यक्त होत आहे. कल्याणी व गौरवकुमार ब्रह्मभट दोघे लंडनला विमानाने निघाले होते. मात्र या प्रवासात दरम्यान त्यांनी आपला मुलगा व मुलगी यांना घरीच कल्याणीच्या सासू-सासऱ्यांकडे ठेवले होते. मुलगा इयत्ता दहावीच्या वर्गात तर मुलगी सहावीच्या वर्गात शिकत असल्याचे समजते.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला