पुसेगाव पोलीसांनी रेस्क्यु टीमच्या मदतीने नेर तलावत बुडालेल्या व्यक्तीचा मृतदेह शोधून बाहेर काढला
तक्रार दाखल होती मेहुणा बेपत्ता झाल्याची
निसार शिकलगार - Sun 14th Jun 2026 06:36 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : काल दि. १३ जून २०२६ रोजी खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे नेर तलावावर मासे पकडण्यासाठी गेलेला ३५ वर्षीय मेहुणा अचानक बेपत्ता झाल्याची घटना घडल्या बाबतची मिसिंगची तक्रार पुसेगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
पुसेगाव येथे फरशी बसवण्याचे काम करणारे सुरेंद्र चंद्रजीत सहानी वय ४५ यांनी दिलेल्या खबरी जबाबानुसार, ते आपली पत्नी बलावती, दोन मुले अभिषेक व विवेक आणि मुलगी निशा तसेच मेहुणा जालिंदर नरशिंग सहानी वय ३५ यांच्यासह सध्या पुसेगाव येथे वास्तव्यास आहेत. तालुक्यातील निढळ येथील कॉन्ट्रॅक्टर बापू पवार यांच्या घर बांधकाम व्यवसायात ते फरशी बसाविण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मूळचे ते उत्तर प्रदेशातील गोरखपुर जिल्ह्यातील कम्पियारगंज, बक्तावर नगर, ता. चौमुखा चे रहिवासी आहेत.
सुरेंद्र सहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता ते कामावरून घरी आले. सायंकाळी ४ वाजता ते, त्यांचा मेहुणा जालिंदर नरशिंग सहानी आणि राजू नरशिंग सहानी असे तिघे नेर तलावावर मासे पकडण्यासाठी गेले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जालिंदर सहानी हे कोणाला काहीही न सांगता निघून गेले. बराच वेळ होऊनही ते परत न आल्याने या दोघांनी आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेतला, मात्र ते सापडले नाहीत. त्यानंतर मित्र व नातेवाईकांकडेही चौकशी केली, परंतु त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.
बेपत्ता झालेल्या जालिंदर सहानी यांचे वर्णन सांगून सुरेंद्र सहानी यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंगची नोंद करून नेर तलावातील मासेमारीच्या अनुषंगाने जालिंदर सहानी यांचा शोध सुरू करताना
सदर बेपत्ता व्यक्ती मासे पकडण्यासाठी नेर तलावात गेला असता पाय घसरून पाण्यात पडून बुडला असल्याची देखील शक्यता असू शकते. व कदाचित याचमुळे सापडत नसावा असा कयास बांधून सदर व्यक्तीच्या शोधासाठी तातडीने साताऱ्यातून छ. शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यु टीमला पाचरण करून त्यांच्या पथका मार्फत आज दि. १४ जून रोजी दुपारी ०१.०० वाजता मयत जालिंदर नरसिंग सहानी याचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले. सदर मयताचे पोस्ट मार्टम केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या तब्ब्यात देण्यात आला आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात रानगव्यानंतर आता रानडुकराने केला शेतकऱ्यावर हल्ला.
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sun 14th Jun 2026 06:36 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sun 14th Jun 2026 06:36 pm













