पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
ओला इलेक्ट्रिक स्कुटरने धडक देऊन पशार झालेल्यावर गुन्हा दाखलआशपाक बागवान
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
- बातमी शेयर करा

पुसेसावळी : पुसेसावळी येथील नविन बस स्टॅण्ड समोर रस्त्यावर ६ जून रोजी रात्री ८:३० वा च्या सुमारास रहिमतपूर च्या दिशेने येणाऱ्या ओला कंपनीच्या इलेक्ट्रीक स्कुटर क्रमांक एम.एच.१० ई.एम. ४००२ ने दिलेल्या धडकेत चालत घराकडे निघालेले सय्यद अब्दुल बागवान, रा.पुसेसावळी, वय वर्षे ६९, हे गंभीर जखमी झाले होते. त्यावेळी उपस्थित जमावातील काही इसमांसह त्यांचे सख्खे मेव्हणे इरफान हाशम बागवान यांनी रिक्षा मधून प्राथमिक आरोग्य केंद्र, पुसेसावळी येथे उपचारासाठी दाखल केले. तर संबंधित दुचाकीस्वार पळ काढत असताना जमावाने त्यास अडवले असता त्यासही मार लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यासही उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी सांगितले असता नकार देत खाजगी रूग्णालयात जाणार असल्याचे सांगत पळ काढण्यात यशस्वी झाला होता. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी जखमी सय्यद बागवान वर प्रथमोपचार करून सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यासाठी आवश्यक ते स्थानांतरण पत्र दिले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार त्यावेळी पुसेसावळी दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात तातडीने भेट देत वैद्यकीय अधिकारी यांचेकडून जखमीची परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी सय्यद बागवान यांच्या डाव्या पाला गुडघ्याखाली जखम झाली असून फ्रॅक्चर असण्याची तसेच डोक्यास उजव्या बाजूस मार लागल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाली असण्याची शक्यता वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितलेने गांभीर्य लक्षात घेऊन अपघात करून खाजगी रूग्णालयात उपचार करण्याचे सांगुन पशार झालेल्या इसमाचे ओळखीचे असलेल्या सतिश चव्हाण, रा. पुसेसावळी याचेकडून अपघात करून पशार झालेला इसम आर्यन सवदे आणि त्याचा बंधू ओम सवदे या दोघांचा संपर्क नंबर उपस्थितां पैकी काहींनी घेतला होता. पशार झालेल्या इसमाने उपचारासाठी कडेगांव जि. सांगली येथे उपचारासाठी निघाला असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे यांनी नंबर घेत ओम सवदे यांस फोन करत पुसेसावळी दुरक्षेत्रात तातडीने हजर राहण्यास सांगितले होते.त्यानंतर आलेल्या १०८ रूग्णवाहीकेतून जखमी सय्यद बागवान यांस जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा येथे हलविण्यात आले. त्यानंतर ७ जून रोजी दुपारी १२:१० च्या सुमारास उपचारादरम्यान सय्यद अब्दुल बागवान यांचा मृत्यू झाला असून पंचनामा आणि शवविच्छेदन केल्यानंतर राहत्या गावी पुसेसावळी येथे दफनविधी साठी मयत आणणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. त्यानुसार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास मयताचा दफनविधी पुसेसावळी येथील मुस्लिम समाज दफनभूमी येथे करण्यात आला.
याबाबतची फिर्याद देण्यास कोणीही नातेवाईक पुसेसावळी दुरक्षेत्रात न आल्याने पुसेसावळी दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक अविनाश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार राहुल वाघ, पोलिस हवालदार सचिन राऊत यांचेकडून ई साक्ष मध्ये घटनास्थळी भेट देवून पंचनामे करण्यात आले. त्यासोबतच सुओ मोटो अंतर्गत पुसेसावळी बिट चे पोलिस हवालदार राहुल संपतराव वाघ यांनी आरोपी नामे आर्यन अशोक सवदे,वय-२२ वर्षे रा.डफळापुर,ता.जत.जि.सांगली याने त्याचे ताब्यातील ओला कंपनीची इलेक्ट्रीक स्कुटर नंबर क्रं.एम.एच.-१०-ई. एम.४००२ ही रहिमतपुर बाजुकडुन हयगयीने, अविचाराने, निष्काळजीपणे, रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन,भरधाव वेगात चालवुन यातील मयत नामे सय्यद अब्दुल बागवान,वय-६९ वर्षे, रा.पुसेसावळी, ता.खटाव जि.सातारा यांना जोराची धडक देवुन त्याचे डोक्यास व डावे पायास गंभीर दुखापत होवुन स्वत:चे वाहनाचे नुकसानीस व स्वत:चे दुखापतीस कारणीभुत झाला आहे. तसेच अपघातातील जखमीस उपचारास न नेता व पोलीस ठाणेस खबर न देता निघुन गेला आहे.म्हणुन त्याचे विरुध्द सरकारतर्फे बी.एन.एस.एस.कलम-२८१,१२५(ए),१२५(बी),१०६(१),३२४(२) मोटार वाहन कायदा कलम-१८४,१३४(अ)(ब) प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास सुखदेव बुधे, पोलिस हवालदार औंध हे करीत आहेत.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Thu 12th Jun 2025 04:17 pm
-
प्रीतिसंगमावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या घरातील सुनेला घोणसच्या पिल्लाने घेतला चावा
- Thu 12th Jun 2025 04:17 pm