सातारा एसटी आगराचा मनमानी कारभार.

सातारा दुर्गळवाडी एस टी अनिमित फेऱ्यामुळे विद्यार्थी तसेच चाकरमण्यांचे  हाल.

 देशमुखनगर : सातारा दुर्गळवाडी एसटीच्या अनियमित फेऱ्यामुळे विद्यार्थी तसेच चाकरमान्याचे  मोठे हाल होत आहेत दुर्गळवाडी हे सातारा तसेच कोरेगाव तालुक्यांचे शेवटचे टोक आहे, या एसटी मधून दुर्गळवाडी सह परिसरातील गावातील विद्यार्थी तसेच रोजीरोटी साठी  मोठ्या संख्येने प्रवास करत असतात दुर्गळवाडी सातारा एसटीच्या फेऱ्या कधीही बंद कधी चालू होत असतात या अनियमित यावरून आगारातील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पाहिला मिळत आहे असा या अनियमितपना मुळे विद्यार्थी तसेच चाकारमाने यांचे मोठे हाल होत आहेत. यामुळे विद्यार्थी तसेच पालक यांच्यात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.या फेऱ्या नियमित व्हाव्या म्हणून पालक तसेच गावातील उपसरपंच यांनी अनेक वेळा एस् टी   आगरास निवेदनही दिले तरी कोणता फरक पडला नाही या अचानक रद्द होणाऱ्या फेऱ्या तसेच मुक्कामी फेरा बंद केला यामुळे रात्री उशिरा शाळा कॉलेज तसेच कामावरून येणारे यांची मोठी ससे होलपट होत आहे दुर्गळवाडी मुक्कामी तसेच दिवसभराच्या असणाऱ्या फेऱ्या नियमितपणे सुरू कराव्यात अशी मागणी विद्यार्थी पालक यांच्यातून होत आहे असे न झाल्यास आम्ही जन आंदोलन करू असा इशारा पालक विद्यार्थी यांनी दिला आहे


 सातारा दुर्गळवाडी एसटीतून दुर्गळवाडी सह परिसरात विद्यार्थी तसेच चाकरमान्यांची संख्या मोठी प्रमाणात आहे तरी सातारा दुर्गळवाडी  मुक्कामी तसेच दिवस भरातील अचानक बंद होत असतात यामुळे विद्यार्थी हाल होत आहेत तरी यापुढे सातारा मुक्कामी तसेच दिवसभरतील फेऱ्या नियमित सुरू  करण्यात याव्यात अन्यथा आम्ही आंदोलन छेडू 
उपसरपंच तुळशीदास यादव दुर्गळवाडी.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त