हिंदुत्ववादी संघटनांचा साताऱ्यात रस्ता रोको

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात राष्ट्रीय महामार्ग रोखला, आरोपीला कडक शासन करण्याची मागणी

हडपसर येथे काही दिवसांपूर्वी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची विटंबना एका माथेफिरूने केली, त्या माथेफिरू ला
मनोरुग्ण ठरवण्यात आले आणि त्याच्यावर किरकोळ कारवाई केली गेली 

वास्तविक पाहता श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण विश्वाचे दैवत आहेत असे असताना त्यांच्या स्मारकाची विटंबना करण्याचे धाडस करण्यात आले आणि त्याला कमी शिक्षा झाली याचा निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्ववादी संघटनामार्फत रास्ता रोको करण्यात आले 

साताऱ्यात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार बॉम्बे रेस्टॉरंट चौकात महामार्ग अडवून रास्ता रोको करण्यात आले आणि आरोपी हा मनोरुग्ण असला तरीही त्याला कडक शासन व्हावे आणि इथून पुढे कोणीही असा प्रकार करण्याचा विचारही मनात आणू नये यासाठी कायदा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली 

साताऱ्यातील विश्व हिंदू परिषद, हिंदू एकता आंदोलन, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, भारतीय जनता पार्टी आणि समस्त हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त