सातारा जिल्ह्याला 3 दिवस ऑरेंज अलर्ट

सातारा  : सातारा जिल्ह्याला आज येलो तर पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे पावसाची शक्यता चांगली वर्तवली जात असून पेरण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिले आहे. शेतात सध्या यांत्रिकरणाद्वारे पेरण्या उरकरण्यावर शेतकरी भर देत आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली नसल्याने दुष्काळी तालुक्यात अद्याप आभाळाकडे शेतकरी डोळे लावून आहे.

????हवामान खात्याचा इशारा????
--------------
19 ते 21 जुलै 2023 या कालावधीत सातारा जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्य मानाची शक्यता वर्तवलेली आहे
--------------
नागरिकांनी घ्यावयाची काळजी
...…...........…...........
????पाऊस पडताना विजा चमकत असल्यास झाडाखाली  आश्रय घेऊ नका, व मोबाईलचा वापर करू नका 
????पाण्यात असाल तर त्वरित पाण्याबाहेर पडा.
???? दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी. व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे.
????मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नका.
???? नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे.
????जुन्या मोडकळीस आलेल्या घरात/इमारतीत आश्रय घेऊ नका.
????नदी- नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.
???? या कालावधीमध्ये नागरिकांनी शक्यतो पर्यटन स्थळी जाण्याचे टाळावे.
????अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका 
.....…...….................
जिल्हा नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय सातारा

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत कोयनानगर 77 व नवजाला 98 मिलिमीटर व महाबळेश्वरला 150 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी 2071′ 03″ फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा 27.27 टीएमसी झाला आहे.तर धरणात प्रतिसेंकर 16 हजार 18 क्युसेस पाण्याची आवक आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त