महायुतीचे उमेदवार खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ समशेरसिंह नाईक निंबाळकर मैदानात
Satara News Team
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
- बातमी शेयर करा

फलटण :- माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ फलटण येथे फलटण नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला असून त्यांच्या प्रचाराला फलटण शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आज शुक्रवार पेठ, भैरोबा गल्ली, शंकर मार्केट, कसबा पेठ, दगडी पूल या परीसरात मतदारांच्या घरोघरी जाऊन माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार केला. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील पाच वर्षात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत. निरा- देवघर, धोम -बलकवडी जोड कालवा प्रकल्प येणाऱ्या दोन महिन्यांमध्ये पूर्ण करून ते पाणी खंडाळा तालुक्यापासून आदर्की ताथवडा, गिरवी अगदी फलटण तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत कालव्यामधून हा कालवा बारमाही करण्यासाठी काम सुरू असल्याचे यावेळी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.फलटण - लोणंद प्रत्यक्षात रेल्वे सुरू केली असून गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला फलटण - बारामती रेल्वे प्रकल्प प्रत्यक्षात काम सुरू केले आहे. फलटणकरांसाठी आरटीओ ऑफिस सुरू केले असून जिल्हा सत्र न्यायालय फलटण येथे सुरू झाले आहे. तर फलटण - सातारा, फलटण- पुसेगाव, फलटण- सीतामाई घाट, कुळकजाई रस्ता, फलटण- दहिवडी रोड, फलटण -आसू रोड असे फलटण तालुक्यातील रस्त्याची कामे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून सुरू असल्याचे शेवटी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिली.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Thu 11th Apr 2024 02:48 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Thu 11th Apr 2024 02:48 pm