माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला

सातारा : अश्लील फोटो प्रकरणावरून भाजप मंत्री जयकुमार गोरे यांना यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. एका महिलेला नग्न फोटो पाठविल्याच्या आरोपावरून वादात सापडलेल्या जयकुमार गोरे यांच्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

 अशातच शनिवारी रात्री माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे भाजपच्या शाखा उद्घाटन समारंभात आपल्यावरील आरोपांना जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'माझी एकही निवडणूक अशी गेली नाही, ज्यामध्ये माझ्या विरोधात केस झाली नाही. मला अडवण्यासाठी गावातले, जिल्ह्यातले काही लोक सकाळ-संध्याकाळ नदीच्या किनारी जाऊन पूजा बांधतात आणि काळ्या बाहुल्या बांधत आलेत. मात्र, जोपर्यंत जनता आणि माता भगिनी माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत तुम्ही कितीही पूजा केल्या आणि कितीही बाहुल्या बांधल्या तरी माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही,' असा इशारा जयकुमार गोरे यांनी दिला.

 कार्यक्रमात जयकुमार गोरे नक्कीच काहीतरी बोलणार, अशी लोकांची अपेक्षा होती. त्यानुसार गोरे यांनी या सर्व प्रकरणावर सडकून टीका केली. 'मला ज्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, माझ्या विरोधात काळ्या बाहुल्या बांधल्या, त्याचा काहीही उपयोग झाला नाही,' असे त्यांनी सांगितले. 'एका साध्या घरातलं पोरगं तीन वेळा आमदार झाले, हे ज्यांना बघवत नाही, अशी ही मंडळी असून माझी एकही निवडणूक झाली नाही, निवडणूक आली की माझ्यावर केसेस होणे ही दर वेळची गोष्ट बनली आहे', असंही जयकुमार गोरे म्हणाले. 'माझ्या पाठीशी जोपर्यंत देवाभाऊ असल्यानं माझं कुणीही वाकडं करू शकत नाही', असे मंत्री गोरे यांनी विरोधकांना ठणकावलं. कोणी कितीही काळ्या बाहुल्या बांधा. माय-माऊली आणि जनता माझ्यासोबत आहे, असं गोरे म्हणाले.

 दरम्यान, कार्यक्रमात गोरे यांनी मोहिते पाटील यांना मोठा धक्का दिला. पिलीव येथील जिल्हा परिषद सदस्य गणेश पाटील, सरपंच नितीन मोहिते आणि मोहिते गटाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला. यावेळी माढ्याचे माजी खासदार रणजित निंबाळकर आणि माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते उपस्थित होते. गोरे यांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात या प्रकरणाला कोणतं वळण मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला