मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन

दहिवडी : सातारा जिल्ह्याच्या राजकारणात सुरुवातीच्या काळापासून चर्चेत असलेल्या दहिवडी नगरपंचायतीच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना,१४ वा वित्त आयोग मूलभूत अनुदान,माझी वसुंधरा ३.०,सर्वसाधारण रस्ता अनुदान सन २०२१-२२,२०२२-२३ व २०२३-२४,स्वच्छ भारत अभियान नागरी २.०,स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी २.० मधील शहर स्वच्छता कृती आराखडा यासह दहिवडी नगरपंचायत मालकीच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स टप्पा-१ तळघर आणि तळमजला बांधकाम करणे,माझी वसुंधरा २.० व ३.० अंतर्गत विविध विकासकामे तसेच दहिवडी नगरपंचायत हद्दीतील काँक्रिटीकरण,डांबरीकरण सामुदायिक शौचालय दुरुस्ती,सार्वजनिक शौचालय बांधकाम,दहिवडी नगरपंचायत मालकीच्या जागेत सार्वजनिक मुतारी बांधकाम या १५ कोटी ६६ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा,भव्य सत्कार समारंभ व जाहीर सभा राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रविवार दिः १३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता स्वाती मंगल कार्यालय दहिवडी या ठिकाणी आयोजित केली आहे,तरी दहिवडी व दहिवडी पंचक्रोशीतील सर्व नागरिक, मतदार,भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते,बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन दहिवडी नगरपंचायतीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.नीलम अतुल जाधव यांनी केले आहे.


 मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.नीलम अतुल जाधव यांनी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मंत्री जयकुमार गोरे यांची जाहीर सभा होत असल्याने जयकुमार गोरे नक्की काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.भारतीय जनता पार्टी,शेखर गोरे गट,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नगरसेवकांनी मावळते नगराध्यक्ष सागर पोळ यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडून निवडून आलेल्या सौ.नीलम अतुल जाधव यांना मंत्री गोरे यांनी नगराध्यक्ष पदाची संधी दिली.मंत्री गोरे यांच्याकडे राज्याच्या ग्रामविकास खात्याची मोठी जबाबदारी असून ते मंत्री झाल्यापासून मतदार संघातील अनेक विकासकामांना कोट्यावधीचा निधी आणण्यात यशस्वी झाले आहेत.दहिवडी,वडूज,म्हसवड नगरपरिषदांनाही मोठ्या प्रमाणात निधी येणार यात कोणतीही शंका नाही.प्रथमच भाजपासह राष्ट्रवादीचे नगरसेवकही सभेच्या मंचावर उपस्थित राहणार असल्याने मंत्री जयकुमार गोरे राजकारण विरहित विकास कामांवरच बोलणार की नेत्यांनाही लक्ष करणार हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरणार आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला