फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
राजेंद बोन्द्रे
- Wed 11th Feb 2026 09:49 am
- बातमी शेयर करा
फलटण. सातारा जिल्हा परिषदेच्या फलटण तालुक्यात असणाऱ्या आठ जागांपैकी राष्ट्रवादी अजित पवार एक जागा भाजपा दोन जागा तर शिवसेना पाच जागा अशी रंगत पूर्ण लढत होऊन प्रत्येक गटात अत्यंत चुरशीची लढत झाली. जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी पाच जागावर शिवसेना राजे गटाने वर्चस्व राखून सातारा जिल्ह्यात जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेला संख्याबळ वाढवण्यास मदत केली आहे.
मागील विधानसभा आणि नगरपालिकेमध्ये भाजपा राष्ट्रवादी खासदार गटाने सत्ता हस्तगत केल्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता हस्तगत करण्यासाठी राजे गटाने शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषद मध्ये मुसंडी मारण्यास यशस्वी झाले पण पंचायत समितीमध्ये मात्र समसमान संख्या व झाल्यामुळे निर्विवाद सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनाराजे गटाला भाजपा राष्ट्रवादीच्या ताकतीने तुल्यबळ लढत देऊन समसमान जागा राखण्यात यश आले. पंचायत समितीची सत्ता हस्तगत करायची या मनसुब्यानेच भाजपा राष्ट्रवादी खासदार गट या निवडणुकीत प्रचाराचा झंजावात निर्माण करून ताकतीने उतरला होता. आणि फलटण तालुक्यातील पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटाची जबाबदारी घेतलेले ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील यांनी मात्र आपल्या राजकीय अनुभवाच्या कल्पकतेने वापर करून वाठार निंबाळकर हिंगणगाव गटात विजय प्राप्त करून दिला फक्त साखरवाडी गटात त्यांना विजय नोंदवता आला नाही. परंतु काही ठिकाणी कार्यकर्त्यांच्या हट्टाखातर आणि आग्रही भूमिकेमुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पंचायत समिती गणात काही उमेदवारांना उमेदवारी द्यावी लागली आणि एकाच गणात त्या उमेदवाराच्या विजयासाठी इतर गणावर दुर्लक्ष झाल्यामुळे पंचायत समितीच्या काही जागा अवघ्या काही मतांच्या फरकाने गमावाव्या लागल्या. आणि पंचायत समितीवर नगरपालिकेप्रमाणेच विजयाचा झेंडा फडकवण्याच्या तयारीत असलेला भाजप राष्ट्रवादीला शिवसेनेने दिलेल्या तुल्यबळ लढतीमुळे आता चिठ्ठीवर दैव बलवत्तर म्हणण्याची वेळ आली आहे. पंचायत समितीच्या 16 गणामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रल्हाद तात्या पाटील आमदार सचिन पाटील शिवरूप राजे खर्डेकर नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रचाराचा झंजावात निर्माण करून आपला विकासाचा दृष्टिकोन जनतेसमोर मांडला होता. परंतु ग्रामीण भागात राजे गटाचे 30 वर्षापासून असणारे वर्चस्व पाहता आणि निवडणुकीचा राजकारणाचा कार्यकर्त्यांचा अनुभव पाहता खासदार गटाच्या तरुण कार्यकर्त्यांना त्यांच्यासमोर निर्माण केलेल्या आव्हानांना ताकतीने तोंड द्यावे लागत होते. यामुळे काही ठिकाणी योग्य उमेदवार दिला असता तर भाजपा राष्ट्रवादीने विजय निश्चित केला असता असेही दिसून आले. तर दुसरीकडे राजे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या कल्पक आणि अनुभवी रणनीतीने गटात मोठ्या मताधिक्याने विजय प्राप्त केला आहे. यामुळे आता भाजपा राष्ट्रवादीला पुन्हा एकदा तालुक्यात गावागावात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी जातीने लक्ष घालून निर्माण करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेच्या आठ गटापैकी प्रत्येक गटात परिस्थिती पाहता प्रचाराची सुरुवात या गटातील पाडेगाव येथून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत करून सुद्धा शिवसेनेचे गिरीश सुदाम बनकर 964 मतांनी विजयी झाले.
साखरवाडी पिंपळवाडी गटात शिवसेनेच्या रूपाली सरगर भाजपाला धक्का देत 850 मतांनी विजयी झाल्या. तर याच गटात राष्ट्रवादीचा शिवांजली भोसले सर्वाधिक मतांनी विजयी झाल्या आहेत.
विडणी जिल्हा परिषद गटात भाजपा राष्ट्रवादीच्या युतीच्या वतीने राष्ट्रवादीच्या सुषमा मोरे यांचा अवघ्या 93 मतांनी पराभव होऊन शिवसेनेच्या ज्योती मोरे विजयी झाल्या. विडणी गटातील भाजपसाठी हा अनपेक्षित पराभव म्हणावा लागेल.
तर गुणवरे गटात भाजपा राष्ट्रवादीच्या ऋतुजा अभिजीत जगताप यांनी शिवसेना राजे गटाच्या हेमलता जगताप यांचा तब्बल 2529 मतांनी पराभव केला. राजे गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या बरड जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या वैशाली संदीप कांबळे यांनी 2085 मतांनी विजय प्राप्त केला.
अत्यंत चुरशीची कोळकी गटातील निवडणूक होणार म्हणून संपूर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते पण या कोळकी गटात शिवसेना राजे गटात राष्ट्रवादीत केलेला प्रवेश सोडून नव्याने शिवसेनेत प्रवेश करून फलटणचे माजी आमदार चिमणराव कदम यांचे पुत्र सह्याद्री कदम यांनी भाजपाचे सातारा जिल्हा सरचिटणीस असणारे उमेदवार जयकुमार शिंदे यांचा तब्बल तीन हजार मतांनी पराभव केला. हा अनपेक्षित भाजपला धक्का होता.
पण वाठार निंबाळकर या गटात भाजपाने विष्णू लोखंडे या दमदार कार्यकर्त्याला उमेदवारी देऊन राजे गटाच्या उमेदवाराचा 3041 मतांनी पराभव केला.
संपूर्ण फलटण तालुक्याचे कोळकी गटाप्रमाणे हिंगणगाव गटाकडे लक्ष लागून राहिले होते. हा गट दत्ता बापू अनपट यांचा वर्चस्व असणारा राजे गटाचा बालेकिल्ला समजला जातो.
परंतु येथे दत्ता बापू अनपट यांच्या उमेदवार पत्नी सारिका अनपट यांचा नवख्या उमेदवार किरण नलवडे यांनी निसटता विजय प्राप्त करून 178 मतांनी आपला विजय नोंदवला.
अशा अत्यंत ग्रामपंचायती सदस्याप्रमाणे झालेल्या चुरशीच्या निवडणुकीमुळे फलटण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटात मोठी रंगत आल्याचे दिसून येत आहे.
दोन्ही गटाच्या काही उमेदवारांची निसटते विजय पाहता ग्रामीण भागामध्ये दोन्ही गटांची ताकद आता समसमान दिसून येत आहे भाजपा राष्ट्रवादीची आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद साठी असणाऱ्या एकूण मतांमध्ये खूपच कमी फरक आढळून येत आहे यामुळे भाजपा राष्ट्रवादीने पण आता ग्रामीण भागात विधानसभेनंतर चांगली पकड घेतल्याचे दिसून येत आहे. शिवसेना राजे गटाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील शिवराय आमदार सचिन पाटील या सर्वांच्या समन्वयाने ताकतीने लढत दिल्याने पंचायत समितीमध्ये समसमान जागा राखण्यात त्यांना यश आले तर काही अवघ्या थोड्या मतांनी जिल्हा परिषद मध्ये त्यांच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला. तरडगाव साखरवाडी आणि विडणी या गटात भाजपा राष्ट्रवादीला निसटता पराभव स्वीकारावा लागला. या तीन जागा भाजपा राष्ट्रवादीला मिळाल्या असत्या तर भाजपा राष्ट्रवादीचे संख्याबळ सहा झाले असते. जातीय समीकरणे आणि निष्ठावंत कार्यकर्ते आणि नवीन झालेले पक्ष प्रवेश यांचा समन्वय साधला गेल्यास भविष्यात भाजपा राष्ट्रवादी पुन्हा अग्रेसर ठरून तालुक्यात आपले वर्चस्व सिद्ध करू शकते. पंचायत समितीच्या काही गणांमध्ये काही निष्ठावंत कार्यकर्ते उमेदवार म्हणून उभे होते त्यांच्या विजयासाठी इतर काही पंचायत समिती गणामध्ये रणजितसिंह ना आपला प्रचाराचा झंजावाता ची रणधुमाळी वेळेअभावी प्रबळ करता आली नाही.
यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 11th Feb 2026 09:49 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 11th Feb 2026 09:49 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 11th Feb 2026 09:49 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 11th Feb 2026 09:49 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 11th Feb 2026 09:49 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 11th Feb 2026 09:49 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Wed 11th Feb 2026 09:49 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 11th Feb 2026 09:49 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Wed 11th Feb 2026 09:49 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Wed 11th Feb 2026 09:49 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Wed 11th Feb 2026 09:49 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Wed 11th Feb 2026 09:49 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 11th Feb 2026 09:49 am












