आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
Satara News Team
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
- बातमी शेयर करा
मेढा : आखाडे सोसायटीचा ठराव आपल्या बाजूने झाला नाही, या रागातून राजे गटाचे कार्यकर्ते रणजीत सुरेश शिंदे (वय ४२) यांच्यावर हुमगाव येथील पेट्रोल पंपावर सहा जणांनी लाठ्या-मुठ्यांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (१३ ऑगस्ट) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास घडला. या हल्ल्यात रणजीत शिंदे यांच्या शर्टच्या खिशातील रोख रक्कम तसेच गळ्यातील सुमारे एक तोळा वजनाची सोन्याची साखळी काढून घेतल्याचा आणि अंगावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
रणजीत शिंदे हे आपल्या वाहनात पेट्रोल भरण्यासाठी हुमगाव पेट्रोल पंपावर गेले असता अमोल जनार्दन शिंदे तेथे उपस्थित होता. रणजीत यांना पाहताच अमोलने ‘आमच्या बाजूने सोसायटीचा ठराव दिला नाही’ असे म्हणत वाद घातला आणि धक्काबुक्की सुरू केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर अमोलने गणेश पवार याला बोलावून घेतले, तसेच मोबाइलवरून अमित जनार्दन शिंदे, प्रमोद मानसिंगराव शिंदे, प्रकाश मधु भिलारे आणि जनार्दन मानसिंग शिंदे यांना घटनास्थळी बोलावून घेतल्याचा आरोप आहे.
सर्वजण घटनास्थळी आल्यानंतर आखाडे सोसायटीच्या ठरावाचा मुद्दा उकरून काढत रणजीत शिंदे यांना लाठ्या-मुठ्यांनी मारहाण करण्यात आली. अमोलने मागून जोरदार बक्की मारल्याने रणजीत जमिनीवर कोसळले. त्यानंतरही त्यांच्यावर लाठ्यांनी मारहाण सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप आहे. मारहाणीच्या दरम्यान अमोलने रणजीत यांच्या खिशातील रोख रक्कम आणि गळ्यातील एक तोळा सोन्याची साखळी काढून घेतली. तसेच ‘अंगाला पेट्रोल टाकून जाळून टाकेन’ अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, रणजीत शिंदे यांच्यावर हल्ला सुरू असल्याचे पाहून आखाडे येथील सचिन उत्तम शिंदे, विक्रांत बापूसाहेब शिंदे आणि प्रशांत शिवाजीराव शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत हस्तक्षेप करून भांडण सोडवले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेल्याचे सांगण्यात आले. विक्रांत बापूसाहेब शिंदे यांनी खाजगी वाहनातून जखमी रणजीत शिंदे यांना मेढा पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, मेढा येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मेढा पोलीस ठाण्यात दाखल झाले. जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, तालुका अध्यक्ष संदिप परामणे, ज्ञानदेव राजणे, समीर आत्तार, जयदिप शिंदे, संतोष वारागडे, नगरसेवक शिवाजी देशमुख, मंडळ अध्यक्ष मारुती चिकणे यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी मेढा पोलीस ठाण्यात पोहोचून घटनेची माहिती घेतली. त्यामुळे या मारहाणीच्या घटनेला स्थानिक राजकीय रंगही चढला असून पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती.
उपचारानंतर रणजीत शिंदे यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अमोल जनार्दन शिंदे, गणेश पवार, अमित जनार्दन शिंदे, प्रमोद मानसिंगराव शिंदे, प्रकाश मधु भिलारे आणि जनार्दन मानसिंग शिंदे (सर्व रा. हुमगाव, ता. जावली, जि. सातारा) यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून मेढा पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक विजय रामचंद्र शिंगाटे करीत आहेत.
सोसायटीच्या एका ठरावावरून सुरू झालेला वाद थेट लाठ्या-मुठ्या, सोन्याची साखळी व रोख रक्कम काढून घेण्याच्या आरोपांपर्यंत आणि पेट्रोल टाकून जाळण्याच्या धमकीपर्यंत पोहोचल्याने जावलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात पोलीस नेमकी काय कारवाई करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. आरोपांची सत्यता मात्र पोलीस तपासातून स्पष्ट होणार आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Thu 13th Aug 2026 09:53 pm
-
हातगेघर ठराव फसला; जावळीतील राजकारण तापले, मानकुमरे बंधूंचा शिंदेंवर थेट राजकीय हल्लाबोल
- Thu 13th Aug 2026 09:53 pm












