राज्यात सरकार युतीचे अन् पुसेसावळी जिल्हा परिषद गटात विकास निधीचे श्रेय मात्र भाजपचे?
आशपाक बागवान.
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
- बातमी शेयर करा
पुसेसावळी : महाराष्ट्रात महायुती सरकार (भाजप-शिवसेना शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट) सत्तेत असताना विकास निधी व कामांचे वाटप युतीच्या भागीदारीने होत असल्याचा दावा केला जातो. पण सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी जिल्हा परिषद गट मात्र वेगळीच कहाणी सांगतो. इथे विकासाच्या नावाने मोठमोठे निधी आले, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा-आरोग्य सुविधा आदी कामे झाली, पण श्रेय घेण्याची स्पर्धा फक्त भाजपकडूनच दिसते. युतीचे इतर घटक कुठे दिसत नाहीत, असा आरोप स्थानिक स्तरावर होतोय.
पुसेसावळी गट ज्यात पुसेसावळी व म्हासुर्णे पंचायत समिती गणांचा समावेश होतो. विशेष म्हणजे राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारचे तिन्ही घटकपक्ष एकमेकां समोर उभे ठाकले आहेत. गेल्या काही वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून इथे लाखो- करोडोंचा निधी आला. ग्रामसडक योजना, जल जीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, शालेय इमारती, आरोग्य केंद्रे आदींसाठी निधी वितरित झाला. पण या कामांचे उद्घाटन, फलक लावणे, सोशल मीडियावर पोस्ट करणे, प्रचार सभा घेणे हे सगळे भाजपच्या नेत्यांकडून आणि कार्यकर्त्यां कडूनच होताना दिसते.
पुसेसावळी जिल्हा परिषद गटात सौ. तेजस्विनी विक्रमशील कदम या भाजपच्या अधिकृत उमेदवार असून, त्यांच्या प्रचारात "विकास निधी आणला, कामे केली" असा दावा ठामपणे केला जातो. प्रचार दौर्यात, हळदी-कुंकू कार्यक्रमात, गावोगावी भेटी देताना "भाजपनेच विकास केला" असा संदेश दिला जातो. सोशल मीडियावरही भाजपचे कमळ चिन्ह लावून विकास कामांचे फोटो, व्हिडिओ व्हायरल होतायत.
मात्र युती सरकार असताना जिल्हा परिषद निधी, आमदार/खासदार निधी, पालकमंत्री निधी यांचा वापर होतो. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना शिंदे गट) आहेत. तरीही पुसेसावळी गटात शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून विकास निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न दिसत नाही. उलट, शिवसेना शिंदे गटाकडून सौ. काजल सुभाष कदम (नांगरे पाटील) या उमेदवार असल्या तरी त्यांचा प्रचार "मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि मा.पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांच्या आशीर्वादाने" असा आहे, विकास निधीवर फारसा भर नाही. राष्ट्रवादी कडून ही कु.रिया सुभाष पिसाळ, उमेदवार आहेत, पण त्यांचा फोकस "घराणेशाहीला विरोध" आणि "जनशक्ती" वर असून "धनशक्ती vs जनशक्ती" चा नारा देतायत. पण विकास निधीचे श्रेय फक्त भाजपकडेच राहताना दिसते.
स्थानिक एका मतदाराने सांगितले, "सरकार युतीचे आहे, निधी सर्वांकडून येतो. पण फलकावर, कार्यक्रमात फक्त भाजपचे नेते दिसतात. युतीचे इतर पक्ष काय करतायत? फक्त निवडणुकीत चिन्ह मागायला येतात का?" हे चित्र पुसेसावळी गटात स्पष्ट दिसते. युती सरकारच्या नावाने निधी येतो, पण श्रेय फक्त एकाच पक्षाचे! सुरू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत हाच मुद्दा मोठा वादळ निर्माण करेल का? पुसेसावळी गटातील मतदारांकडे आता प्रश्न आहे.विकासाचे खरे श्रेय कोणाचे? युतीचे की फक्त भाजपचे?
स्थानिक बातम्या
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
संबंधित बातम्या
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
पुसेसावळी गटात निवडून कोणाला आणायचं यापेक्षा पाडायचं कोणाला यावर भर.
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातून शिवसेना शिंदे गटाच्या सौ.काजलताई नांगरे पाटील मैदानात
- Mon 2nd Feb 2026 07:24 pm











