वाठार निंबाळकर येथील शेतकरी आक्रमक. जिल्हा परिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार.

फलटण. : फलटण तालुक्यातील वाठार निंबाळकर या गावातील शेतकरी प्रलंबित रस्त्याच्या कामामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत असे निवेदन त्यांनी आज फलटणचे उपविभागीय प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिले आहे. 

वाठार निंबाळकर गावातील कुदळे वस्ती नावाच्या शिवारात शेतकऱ्यांची बहुसंख्य मोठ्या घरांची वस्ती असून मागील काही वर्षापासून या रस्त्याबाबत तहसीलदारांनी दिनांक पाच मार्च 2013 रोजी मौजे वाठार निंबाळकर तालुका फलटण येथील अर्जदारांचे क्षेत्र जमीन गट नंबर 236 मध्ये जाणे येण्यासाठी जमीन गट नंबर 217 218 237 ते 259 च्या सर बांधने दहा फूट रुंदीचा रस्ता देण्यात येत आहे. असा आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत असल्यामुळे या वस्तीवरील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोई मुळे त्यांनी या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना या शेतकऱ्यांनी सांगितले की आमच्या कुदळे वस्ती कडे येण्या जाण्यासाठी फलटण पुसेगाव रस्ता ते कुदळे वस्ती असा रस्ता आहे सदर रस्ता हा गेली वीस वर्षापासून वहिवाटीत आहे परंतु हा कच्चा रस्ता असल्यामुळे पावसाळ्यात वयोवृद्ध महिला गर्भवती महिला तसेच शाळेत जात असणाऱ्या विद्यार्थ्यांना या रस्त्याने जाता येत नाही यामुळे त्यांची गैरसोय होत असून फक्त दहा फुटाचा रस्ता ची मागणी केल्यावर तहसीलदार यांनी आदेश देऊन सुद्धा गावात बाहेरून येऊन शेती खरेदी केलेले श्री नानासो बापूराव सरक हे दादागिरी करून या रस्त्याची दुरुस्ती व डागडुजी करून न देता नागरिकांना नाहक त्रास देत आहेत. यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून मोठमोठे खाचखळगे रस्त्यात असल्याने कोणतेही वाहन येऊ शकत नाही तसेच पावसाळ्यात या रस्त्याची दुरावस्था असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत हा रस्ता करण्यासाठी तहसीलदार यांनी आदेश पण दिलेला असताना सुद्धा सरक यांच्या कृतीमुळे रस्ता होत नसल्याने आमचा रस्ता न झाल्यास आम्ही येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असे निवेदन त्यांनी आज प्रांत अधिकारी यांच्याकडे दिले. 

याबाबत येथील शेतकरी श्री सचिन कुदळे खोपडे तसेच इतर शेतकरी  यांनी आम्हास न्याय मिळावा अन्यथा शासन दरबारी आम्हाला तीव्र आंदोलन करावे लागेल. असा इशारा दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला