मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
Satara News Team
- Wed 7th May 2025 07:01 am
- बातमी शेयर करा

काश्मीर: भारतात नागरिकांना युद्धसज्जतेचे आदेश देत भारतीय संरक्षण दलांनी मिळून पाकिस्तानवर हल्ले चढविले आहेत. रात्री दोनच्या सुमारास भारतीय हवाई दल, नौदल आणि सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जवळपास सहा ठिकाणी मिसाईलचा जोरदार वर्षाव केला आहे. पाकिस्तानने याची माहिती दिली आहे.
पाकिस्तानकडून याचे प्रत्यूत्तर मिळण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय सैन्याने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या आहेत, असे सांगितले आहे.
भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. ज्या भागातून भारतात दहशतवादी पाठविण्याचे काम पाकिस्तान करत होता त्या भागांवर मिसाईल डागण्यात आली आहेत. पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला करण्यात आला आहे.
भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले आहे. पाक सैन्याने सांगितले की, ६ ठिकाणी २४ हल्ले करण्यात आले. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३३ जण जखमी झाले आहेत. या ९ ठिकाणांवर हल्ले... भारतीय सेनेने पाकिस्तान आणि पीओके मध्ये या 9 ठिकानांवर हल्ले केले आहेत.
1. बहावलपूर
, 2. मुरीदके,
३. गुलपुर,
४. भीमबर,
5. चकअमरू
6. बाग,
7. कोटली,
8. सियालकोट
9. मुजफ्फराबाद
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 7th May 2025 07:01 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 7th May 2025 07:01 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 7th May 2025 07:01 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 7th May 2025 07:01 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 7th May 2025 07:01 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 7th May 2025 07:01 am
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Wed 7th May 2025 07:01 am
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Wed 7th May 2025 07:01 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Wed 7th May 2025 07:01 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Wed 7th May 2025 07:01 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Wed 7th May 2025 07:01 am
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Wed 7th May 2025 07:01 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Wed 7th May 2025 07:01 am
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Wed 7th May 2025 07:01 am