सातारा आम आदमी पार्टीच्यावतीने देशाचा स्वातंत्र्यदिन जल्लोषात साजरा

सातारा : देशाचा अमृत महोत्सवी वर्षातील 76 वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. तसेच आम आदमी पार्टी सातारा जिल्ह्याच्यावतीने देखील पार्टीच्या करंजे, सातारा येथील संपर्क कार्यालयाच्या समोरील प्रांगणात ध्वजारोहन कार्यक्रम करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे चंद्रशेखर चोरगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहन झाल्यानंतर उपस्थितांनी राष्ट्रीय गीत, झेंडावंदन गीत, ध्वजाला राष्ट्रीय सलामी, संविधान वाचन, राष्ट्रविजयी घोषणा देवून परिसर दणाणून सोडला होता. यानंतर उपस्थितांमधील जिल्हा उपाध्यक्ष रतन पाटील, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिकेत खताळ, चंद्रशेखर चोरगे यांनी मनोगते व्यक्ती केली आणि सर्वानी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थितांना जिलेबीचे वाटप करण्यात आले.
याच बरोबर देशाची एकता व अखंडता कायम राहावी या उद्देशाने सकाळी 10.00 वाजता आम आदमी पार्टीच्या वतीने सातारा शहरात तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रा आम आदमी पार्टी करंजे येथील संपर्क कार्यालयापासून शिवतीर्थ पोवई नाका, राजवाडा, मोती चौक, राधिका चौक, एसटी स्टॅण्ड सातारा येथून पुन्हा करंजे या ठिकाणी संपन्न करण्यात आली. या तिरंगा यात्रेत आम आदमी पार्टीचे शेकडो कार्यकर्ते मोटरसायकलने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमासाठी चंद्रशेखर चोरगे, आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव, माजी पश्‍चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर, उपाध्यक्ष महेंद्र बाचल, जिल्हा सचिव निवृत्ती शिंदे, रतन पाटील, मारुती जानकर, ऍड. धिरजसिंह जाधव, मंगेश महामुलकर, धैर्यशिल लोखंडे, मकरंद औंधकर, जयराज मोरे, सादिक शेख, एजाज शेख, अनिकेत खताळ, डॉ. खंदारे, सुरेश पाटील, अब्बासभाई शिकलगार, अनिकेत नाळे, अशोक नलवडे, सौ. सुनिता चिकणे, सौ. सारिका भोगांवकर, सौ. राजश्री बाचल, सौ. उषा शिंदे आदी कार्यकर्ते व नागरिक तसेच श्रीपतराव पाटील विद्यालय, करंजे येथील विद्याथी उपस्थित होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला