सातारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक यांच्या गलथान कारभारामुळे जावळवाडी उपसरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम रखडला

देशमुखनगर  : सातारा तालुक्यातील जावळवाडी ग्रामपंचायतीचा गेल्या पाच महिन्यापासून सातारा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी वसंत धनवडे आणि ग्रामसेवक राजेंद्र कणसे यांच्या गलथान कारभारामुळे जिल्हा निवडणूक विभागाकडून उपसरपंच पदाचा निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आलेला नाही.
    या पंचायतीचे सरपंच पद आरक्षीत असल्याने ते रीक्तच असले तरी यापूर्वी उपसरपंच गावचा कारभार संभाळत होते. काहि कारणाने त्यांनी रीतसर राजीनामा दिला होता, याबाबत सोपस्कर कागदपत्रे जबाबदार अधिकारी कणसे आणि धनवडे यांनी निवडणूक विभागाला वेळेत दिली नसल्यामुळे जावळवाडीच्या उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रीया प्रशासनाच्या लाल फितीत अडकल्यामुळे गेल्या पाच महिन्यापासून गावकारभारापासून वंचीत आहे. भाऊसाहेबांचा फोन सतत स्वीच ऑफ लागत असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचनींना तोंड द्यावे लागत आहे. उपसरपंच पदाची निवडणूक रखडल्याने अद्यापही या ग्रामपंचायतीवर प्रशासक राज कायम आहे. प्रशासकाला धोरनात्मक निर्णय घेता येत नसल्यामुळे गावची विकासकामे ठप्प झाली असून उपसरपंचपदी निवडणूक कधी होणार याकडे सदस्यासह सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेल आहे.
    उपसरपंचाच्या सहिने होत असलेली विद्यार्थ्यांची शैक्षणिक कामासह अनेक विकासात्मक कामे उपसरपंच पदाची निवड रखडल्यामुळे खोळंबली आहेत. संबंधीत ग्रामसेवक आणि विस्तार अधिकाऱ्याने वेळेत कागदोपत्रे जिल्हा निवडणूक विभागाला दिली असती तर हि उपसरपंच निवड कधिच झाली असती, गेल्या पाच महिन्यापासून खुंटलेल्या विकासाला संबंधित अधिकारी जबाबदार असून झालेल्या नुकसानीबाबत वरीष्ट अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी जावळवाडी ग्रामस्थांची मागणी आहे.
  चौकट
जावळवाडी गावाला गेली पाच महिने उपसरपंच पद रिक्त असल्यामुळे ग्रामस्थांना बऱ्याचश्या अडचणी निर्मान झाल्या आहेत, भाऊसाहेब कवा येतात अन कवा जातात हे कोनालाच कळत नाहि. वायरमेनने दोन वेळा गावच्या पाणीपुरवठ्याची लाईट तोडली होती त्यावेळी गावकऱ्यांनी विनवनी करून लाईट जोडून घेतली आहे.
अमोल जगताप
माजी सरपंच जावळवाडी

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त