भा ज पा कडून शिवराज पाटलांचा निषेध , मारले जोडे
प्रकाश शिंदे
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
- बातमी शेयर करा

सातारा :काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी भगवतगीता चा दाखला देताना अत्यंत सडक्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या सडक्या विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले त्या बद्दल भा ज पा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीण चे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा , येथे निषेध आंदोलन करण्यात आले आणि शिवराज पाटील यांच्या फोटो ला जोडे मारण्यात आले
काँग्रेस चे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांनी जाहीर सभेमध्ये श्रीकृष्ण, अर्जुन आणि भगवतगीता या बद्दल अपशब्द वापरून हिंदू धर्माबद्दल अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला आहे , भगवतगीता हा फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण जगभरात पूजनीय आणि अनुकरणीय असा ग्रंथ आहे , त्या बद्दल अपशब्द वापरणे म्हणजेच देशाबद्दल अपशब्द वापरण्यासारखेच आहे , शिवराज पाटील आणि काँग्रेस च्या सडक्या मेंदूचा भा ज पा तर्फे आम्ही निषेध करतो आणि हिंदू धर्म आणि धर्मग्रंथावरील टीका सहन केली जाणार नाही , त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल,असे सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी या वेळी सांगितले
या वेळी,सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी,ग्रामीण चे आद्यक्ष राजेंद्र इंगळे,जिल्हा सरचिटणीस विट्ठल बलशेटवार, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष निलेश नलावडे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कांबळे,
व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सचिन साळुंखे सिने कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर बेटी बचाव बेटी पढाव जिल्हाध्यक्ष अश्विनी हुबळीकर उद्योजक आघाडी जिल्हाध्यक्ष निलेश शहा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तेजस जमदाडे सातारा शहर सरचिटणीस प्रवीण शहाणे जयदीप ठुसे, तालुका सरचिटणीस गणेश पालखे ,शहर उपाध्यक्ष चंदन घोडके, महिला मोर्चा शहराध्यक्ष रीना भणगे, ओबीसी मोर्चा युवती अध्यक्ष वनिता पवार ,ओबीसी मोर्चा युवा अध्यक्ष महेंद्र कदम ,अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस अमित भिसे, भटके विमुक्त आघाडी महिला अध्यक्ष प्रिया नाईक, सांस्कृतिक आघाडी सातारा शहराध्यक्ष कैलास मोहिते, ओबीसी मोर्चा सातारा शहर उपाध्यक्ष अविनाश खर्शीकर, युवा मोर्च्या चे अमोल कांबळे, शरद कदम, भीमराव लोखंडे, सुधीर काकडे, साई कारळे, संतोष कदम, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Sat 22nd Oct 2022 05:28 am
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Sat 22nd Oct 2022 05:28 am