एम एम ग्रुपचे अध्यक्ष सागर जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

MS GROUP SAGAR JADHAV BIRTHDAY

 सातारा न्यूज -पुसेगाव  औंध येथे एम एम ग्रुपचे खटाव तालुकाध्यक्ष सागर जाधव यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वाढदिवसाचे औचित्य साधत दिवसभरात वृक्षारोपण करणे, वह्या वाटप करणे, फळे वाटप करणे आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे साहेब, बेरड रामोशी कृती समितीचे अध्यक्ष मोहनराव मदने ( नाना ), नायब तहसीलदार रविराज जाधव, रासपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष अक्षयराज माने, सातारा जिल्हाध्यक्ष एम एम ग्रुप येरळवाडी चे सरपंच योगेश जाधव, ग्राप सदस्य उमाजी कुकले, सोमनाथ जाधव. औंधचे मा. सरपंच सुखदेव इंगळे आदि सह भोसरे, जळगाव, कुरोली, वडूज, येरळवाडी, गोरेगाव निमसोड, पळशी, मायणी, यरमलवाडी, नढवळ, अंबवडे, भूषणगड, खरशिंगे, कलेढोण व खटाव माण तालुक्यातील अनेक मान्यवर कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

            यावेळी संघटनेचे अध्यक्ष एम एम नाना म्हणाले, सागर सारख्या नव्या दमाच्या कार्यकर्त्याला संघटनेच्या माध्यमातून खटाव व माण तालुक्यातून पूर्ण ताकद दिली जाईल, समाजातील युवकांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याबरोबर समाजातील युवकाला चांगल्या प्रवाहात आणण्याबरोबर मानाने राहता आले पाहीजे असा विश्वास ही नानांनी व्यक्त केला. यावेळी नायब तहसीलदार श्री जाधव यांनी ही युवकांना मार्गदर्शन केले. आभार संतोष जाधव यांनी मानले

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला