आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला जाहीर पाठिंबा

सातारा  : दरे ता महाबळेश्वर म्हणजेच सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. नुकतेच माथाडी कामगार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ ऋषिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादी पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री शिंदे यांना थेट पाठींबा जाहीर केला आहे.
             सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचा कोंडमारा दूर करण्यासाठी मोठ्या धाडसाने दमदार पाऊल उचलले होते. त्यांना सर्वत्र वाढता पाठींबा मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आ. शशिकांत शिंदे यांचे पुतणे सौरभ शिंदे यांनी ही नवी मुंबईत राहून सातारी बाणा दाखवून दिला आहे.
      घणसोली येथील एका निवासी संकुल बाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्यांच्या समवेत बहुतांश रहिवाशी व नवी मुंबई येथील सुमारे ३५ नगरसेवकांनी ही राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने सौरभ शिंदे यांनी भूमिका घेतली आहे. 
        आदरणीय चुलते आ. शशिकांत शिंदे यांच्या छायेखाली पुतणे सौरभ यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच बाळकडू लाभले आहे. वडील व माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे यांचे ही मार्गदर्शन आहे. आपला माणूस मोठा होत असेल तर त्यांना विरोध करण्यापेक्षा त्यांना पाठींबा दिला पाहिजे. याच भावनेतून सौरभ शिंदे यांनी राजकीय निर्णय घेतला आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल, असे सध्या तरी दिसत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला