अजिंक्यतारा कारखान्याची निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध
Satara News Team
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
- बातमी शेयर करा

सातारा- महाराष्ट्र राज्यातील सहकारी साखर कारखानदारी क्षेत्रातील नावाजलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सलग चौथ्यांदा बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या सर्व मतदारसंघात निवडून द्यायच्या प्रतिनिधी संख्येइतकेच उमेदवार त्या- त्या मतदारसंघात शिल्लक राहिल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत आवटे यांनी दिला आहे. अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना मर्या.शाहुनगर-शेंद्रे,ता.जि.सातारा या कारखान्याची सन-२०२२-२०२३ ते २०२७-२०२८ या कालावधीसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरु होती. महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०१४ च्या नियम ३२ मधील तरतुदीनुसार सत्ताधारी पॅनेलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ऊस उत्पादक सभासद गट क्र. -१ सातारामधून भोसले शिवेंद्रसिंहराजे अभयसिंहराजे, सावंत नामदेव विष्णू, घोरपडे राजेंद्र भिकू हे बिनविरोध निवडून आले. व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -२ नागठाणेमधून साळुंखे मोहनराव नथुराम, निकम एकनाथ उर्फ सुनिल दत्तात्रय, साळुंखे यशवंत हरी यांची बिनविरोध निवड झाली. व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -३ अतितमधून काळभोर शिवाजी रघुनाथ, जगदाळे रामचंद्र रंगराव, जाधव बजरंग श्रीरंग, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक-४ चिंचणेररमधून शेडगे विश्वास रामचंद्र, घोरपडे भास्कर एकनाथ, घोरपडे विजयकुमार आनंदराव, व्यक्ति ऊस उत्पादक सभासद गट क्रमांक -५ गोवेमधून सावंत सर्जेराव दिनकरराव, साबळे पांडुरंग आप्पाजी, पाटील नितीन भानुदास हे बिनविरोध झाले. सातारा उत्पादक संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्थामधून साळुंखे शशिकांत यशवंत, महिला राखीव मतदार संघातून फडतरे विजया सत्पाल आणि शेलार वनिता अशोक, इतर मागास प्रवर्ग राखीव मतदार संघातून कुंभार जयवंत रामचंद्र, वि.जा.भ.ज./विमाप्र राखीव मतदार संघातून कुराडे अशोक रामचंद्र, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातून पवार वसंत जगन्नाथ हे उमेदवार बिनविरोध निवडून आले.
aajikaytara
shivendarraje
स्थानिक बातम्या
मावशीच्या नवऱ्याकडून सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
नागठाणेजवळ टेम्पोच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
75 हजाराची लाच घेताना कोडोलीचा मंडलाधिकारी जाळ्यात
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत पुसेसावळीत उद्या कॅम्पचे आयोजन
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण चार रुग्ण त्यातील एकाचा काल मृत्यू
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
संबंधित बातम्या
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Fri 8th Jul 2022 02:44 pm
-
हणबरवाडी- धनगरवाडी उपसा जलसिंचन योजनेचा दुसरा टप्पा जून अखेर पूर्ण करणार
- Fri 8th Jul 2022 02:44 pm