शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन जीवन संपवेन,,,, खा छ.उदयनराजेंचा तरुणाला फोन
Satara News Team
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
- बातमी शेयर करा

सातारा : सातारा येथील शिवछत्रपतींच्या घराण्यातील व्यक्तीला मंत्रीपद द्यावे, अन्यथा वीजवाहक टॉवरवरुन उडी मारुन आपले जीवन संपवेन, अशी धमकी देणार्या होमगार्ड मध्ये जवान असणार्या एका तरुणाने आपला व्हिडिओ व्हायरल करीत एकच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर ही घटना खा. छउदयनराजेंना समजताच त्यांनी संबंधित तरुणाशी मोबाईलवरुन संपर्क करुन त्याचे समुपदेशन करीत त्याला आत्महत्त्या करण्यापासून परावृत्त केले.
याबाबत माहिती अशी की, सदाशिव ढाकणे रा. राजूर गणपती, जि. जालना येथील होमगार्ड असणार्या तरुणाने आज सकाळी हसनाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्या एका वीजवाहक टॉवर वर चढत सातारा येथील शिवछत्रपती घराण्यातील वंशजांना होऊ घातलेल्या मंत्रीमंडळाच्या विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्रीपद द्यावे,
चार तासांत याबाबतचा निर्णय मला कळवावा; अन्यथा मी या टॉवरवरुन उडी मारुन आपली जीवन संपवेन, असा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करीत संबंधित युवकाने खळबळ उडवून दिली होती. त्याला वाचविण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांसह स्थानिक पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारीही खाली जमून त्यांनी उडी मारु नकोस, अशा विनंत्या केल्या होत्या. परंतू तरीही तो आपल्या निर्णयापासून परावृत्त होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांच्या मार्फत खा.छ उदयनराजेंपर्यंत हा सगळा प्रकार कळविण्यात आला.
त्यानंतर खा.छ उदयनराजेंनी स्वत:च्या भ्रमणध्वनीवरुन संबंधित तरुणास फोन करुन त्याला उडी मारण्यापासून परावृत्त केले. यावेळी शिवछत्रपतींचे विचारही समजावून सांगितले. तसेच तुमच्यावर तुमच्या कुटूंबाची जबाबदारी आहे, याचीही जाणीव करुन दिली. तसेच येणार्या मंत्रीमंडळ विस्तारामध्ये सातारच्या राजघराण्यातील व्यक्तीचा निश्चितपणे समावेश केला जाईल, याचीही हमी दिली.
स्थानिक बातम्या
खटाव पंचायत समितीचा सांख्यिकी विस्तार अधिकारी पावरा ला सामान्य माणसाच्या पावराची भणकच नव्हती
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
सातारा तालुका पोलीसांकडुन हरवलेले एकुण 11 लाख 40 हजार रु. किंमतीचे 76 मोबाईल हस्तगत
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
महामार्गावरील दरोड्याप्रकरणी टोळी जेरबंद
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
वाढे फाटा येथे पिस्तूल विक्रीचा डाव उधळला; सातारा स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग; म्हसवड पोलिसांत गुन्हा दाखल
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
साताऱ्यात हायवेवर वाहतूक अडवून रिल्स बनवणाऱ्या ५ जणांवर पोलिसांची कारवाई
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
संबंधित बातम्या
-
मंत्री जयकुमार गोरेंच्या हस्ते १६ कोटींच्या विकासकामांचे होणार भूमिपूजन;जाहीर सभेचेही आयोजन
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
एक मच्छर काय करतो ते नाना पाटेकरांना विचारा; आ.सचिन पाटलांचा रामराजेंना टोला
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
मंत्री शिवेंद्रसिंहराजेच्या घरासमोर रक्तदान आंदोलन
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
सैनिकांचे मनोबल तोडू नका; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
माझं कुणीही काही वाकडं करू शकत नाय; जयकुमार गोरेंनी शड्डू ठोकला
- Wed 4th Dec 2024 05:43 pm
-
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटीची खंडणी घेताना अटक
- Wed 4th Dec 2024 05:43 pm