भाजपा नेते मा.मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त नागठाणे येथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

देशमुखनगर: नागठाणे ता. सातारा येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस शुक्रवार 26 'मे' रोजी साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध समोजपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 
भाजपा नेते तथा खटाव- माण साखर कारखान्याचे को- चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी दि.22 रोजी नागठाणे येथे भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर एच.व्ही. देसाई आय हाॅस्पिटल हडपसर पुणे आणि मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर चौक नागठाणे येथे सकाळी नऊ वाजता अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड.विक्रम पवार ,ज्येष्ठ नेते आनंदराव नलवडे आबा, संजय बाबा घोरपडे, ॲड धनाजी जाधव, वैजयाताई गुरव, युवराज साळुंखे, यांच्यासह प्रमुख अतिथी बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे उपस्थित राहणार आहेत.
   सदर शिबिरात ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना मोफत ऑपरेशन करून देण्यात येणार आहेत. तसेच ज्यांना नंबर लागला आहे त्यांना चेश्मे मोफत देण्यात येणार आहेत. तरी सदर शिबिराचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा . असे आवाहन मनोज दादा युवा मंच यांच्या वतीने करण्यात आले आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला