जिल्ह्यात वंचितची वाताहत थांबवा : सनी तुपे यांचा घरचा आहेर !

सातारा : अनेक दिवस वंचितमध्ये नाराजीनाट्य व राजीनामासत्र चालूच होते.अखेर वंचित संघर्ष मोर्चाची स्थापना होताच, माजी जिल्हा युवाध्यक्ष सनी तुपे यांनी मनातील खदखद सरतेशेवटी व्यक्त केली.त्यांनी जळजळीत अंजन पक्षातील पदाधिकारी यांच्या डोळ्यात घातले आहे. जणू घरचाच आहेर त्यांनी दिला आहे.
         सनी तुपे यांची वंचितच्या जिल्हा युवाध्यक्षपदी वरिष्ठांकडुनच नियुक्ती झाली होती. तेव्हा जिल्ह्यात त्यांच्याशी कोणाचेही व्यक्तिशः वैर नव्हते. मात्र,काही म्हणत होते की, सर्वाना विचारात घेऊन निर्णय घ्यायला पाहिजे होता.एवढीच चर्चा काही काळ होती. तरीही तुपे यांनी काम त्यांच्यापरीने केले होते.अचानक त्यांनी जिल्ह्याध्यक्षपदाचा राजीनामा दिला.पक्षात राहूनच कार्यरत राहू.असे स्पष्ट केले होते.त्यांनी का राजीनामा दिला ? हे अद्याप गूढच राहिले आहे. तरीही त्यांची ऍड. आंबेडकर यांच्यावरील निष्ठा व प्रेम आढळून येत आहे.
    सनी तुपे यांनी पक्षातील जिल्हा पदाधिकारी यांना खडे बोल केले आहेत.जिल्हा स्तरांवर एकोपा करा.अन्यथा, आता तरी वरिष्ठांनी पक्षाचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे कैफियत मांडुन पक्षाची वाताहत थांबवावी. पक्षातील इतर वरिष्ठांनाही वेळेत दखल घेणे गरजेचे आहे. वंचित बहुजन आघाडी सातारा जिल्हाध्यक्ष यांनी वेळेत सावध होऊन जे जिल्ह्यामध्ये काही चालले आहे. हे थांबवले पाहिजे. जिल्हाध्यक्ष यांनी बेरजेचे समाजकारण व राजकारण करावे.याउलट वजाबाकीचे करू नये. जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई (प.) व भीमराव घोरपडे (पू.) यांनी लवकरात लवकर एकत्रीत सहविचार सभा घ्यावी. जे पूर्वीचे नाराज झालेले कार्यकर्ते व पदाधिकारी यांना एकत्र घेऊन नाराजी दूर करावी.त्यातून त्यांची
नाराजी आपल्यापासून जर दूर होत नसेल तर कृपया करून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांची भेट घेऊन जिल्ह्यामधील काही नाराज कार्यकर्त्यांशी भेट घडवून आणावी.चर्चा झाली तरच जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत होईल.
जिल्ह्यामध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे पक्षाचे वोटिंग कमी होत चालले आहे.कारण, जे लोक वंचित बहुजन आघाडीला आपलेसे मानणारे आहेत. तेही लोक पक्षातील वादामुळे भविष्यामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी इलेक्शनला वोट करतील असं वाटत नाही.असे वोटरच बोलत आहेत. तेव्हा वेळीच दक्षता घेणे गरजेचे आहे. पक्षांमध्ये आजही जिल्ह्यामध्ये असे काही पदाधिकारी आहेत की, "काही प्रस्थापितांनी जर दम दिला तर ते घरातूनपण बाहेर निघणार नाहीत." असाही हल्लाबोल तुपे यांनी केला आहे.ते पुढे म्हणतात, "आजही त्यांच्या घरामध्ये इतर स्थानिक राजकीय पुढाऱ्यांचे फोटो लावले आहेत. असे लोक पक्षातील वरिष्ठ पदावरती बसलेले आहेत.आम्ही पक्षात काम करत असताना असे पण काही कार्यकर्ते पदाधिकारी मिळाली की, जे पक्षाची लायकी काढणारे पण मिळालेले आहेत. तुमची व तुमच्या पक्षाची पण लायकी नाही की, येणारी इलेक्शन लढवायची. अशा पदाधिकाऱ्यांना वेळेत पक्षातील वरिष्ठांनी वेळेत धडा शिकवणे गरजेचे आहे. पक्षातील काही जुन्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी आपल्या प्रपंचांचे वाटोळ पक्षासाठी केलेले आहे. त्यालाच आज पक्षामध्ये जागा नाही. तेव्हा वरिष्ठांनी याची वेळीच दखल घेऊन ऍड.आंबेडकर यांच्याबरोबर चर्चा करावी."

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला