लग्न मालक राहिला बाजूला अन, वाढप्यांचीच पळापळ! आ. शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांना टोला

सातारा- सातारा पालिका हद्दवाढ भागात मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाकडून ४८ कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. या निधीतून शाहूनगर, गोळीबार, विलासपूर, शाहूपुरी आदी भागातील विकासकामे मार्गी लागणार आहेत. मात्र याचे श्रेय आपल्याला मिळावे म्हणून नारळफोड्या गँगने नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पडला. वृत्तपत्रात पेड न्यूजहि दिल्या. या गँगची अवस्था म्हणजे लग्नातील वाढप्यांसारखी झाली आहे. लग्न मालक ज्याने सगळं केलं आहे, तो राहिला बाजूला अन, नुसती वाढप्यांचीच पळापळ सुरु आहे, असा खोचक टोला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांना लगावला.

 

राज्य शासनाच्या ४८ कोटी निधीमधून शाहूनगर, गोळीबार मैदान, विलासपूर, शाहूपुरी आदी भागात रस्ते, गटर, पथदिवे आदी विकासकामे हाती घेण्यात आली असून त्याचा शुभारंभ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी त्यांनी खा. उदयनराजे आणि सातारा विकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराचा खरपूस समाचार घेतला. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक मोने, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, माजी नगरसेवक शेखर मोरे- पाटील, रवी ढोणे, विजय काटवटे, धनंजय जांभळे, शकील बागवान, राजू गोरे, शशिकांत पारेख, आनंदराव कणसे, फिरोज पठाण, नाना पवार, विजय देसाई, आशुतोष चव्हाण, व्यंकटराव मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, निधी मिळून सहा महिने उलटले पण, काही लोकांनी मर्जीतल्या ठेकेदाराला टेंडर मिळावे यासाठी निधी पडून ठेवला आणि या भागातील विकासकामे रखवडली. ज्यावेळी पालिकेत सत्ता होती, त्याकाळात हद्दवाढ भागासाठी सातारा विकास आघाडीने किती कामे केली? आता मुख्याधिकारी प्रशासक असून त्यांना मंजूर कामे तातडीने घेण्याच्या सूचना केल्या आणि आता हि रखडलेली कामे मार्गी लागत आहेत. कोणीतरी वर्तमान पत्रामध्ये पेड न्यूज देऊन स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. ते कोण आणि काय आहेत, हे सातारकरांनी आणि हद्दवाढ भागातील नागरिकांनी चांगलेच ओळखले आहे. मी जे काम केले आहे, तेच मी केले असे सांगतो. मी दुसऱ्याच्या कामाचे श्रेय कधीच घेत नाही. त्यांनी एक चांगलं काम केलं, ग्रेड सेपेरेटरचं! हो ते त्यांचं काम आहे, त्याला मी त्यांनीच केलं असं म्हणणार. काम किती चांगलं आहे हे लोकांनाही माहिती आहे. आयत्या पिठावर रेघोट्या मारणाऱ्यानी सत्ता काळात किती भ्रष्टाचार केला हे सर्वानीच उघड्या डोळ्यांनी पहिले आहे. त्यामुळे आता दुसऱ्यानी  मंजूर केलेल्या कामाचे नारळ फोडून उगाच शायनिंग करू नये. आता तुमची वेळ संपली असून सातारकर तुम्हाला घरी बसवणार आहेत, याचे भान कायम ठेवा.

 

सातारा पालिका हद्दीतील अनेक विकासकामे येत्या काही दिवसात मार्गी लागणार आहेत. त्याचे प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केले आहेत. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अनेक विकासकामे मंजूर करून घेणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे याप्रसंगी म्हणाले. पारेख काका, अविनाश कदम, फिरोज पठाण, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला संग्राम भोसले, दिगंबर महामूलकर, अंकुश कणसे, रवी पवार, प्रकाश घुले, सरपंच आप्पा पिसाळ, आबा जगताप, नाना चव्हाण, बाळासाहेब महामूलकर, युवराज जाधव, प्रकाश घाडगे, गणेश निकम, नीतीराज सूर्यवंशी, अमोल नलावडे, सुशांत महाजन, पप्पू घोरपडे यांच्यासह विलासपूर, शाहूनगर, गोळीबार मैदान परिसरातील असंख्य महिला, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.  
 
 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला